नितेश राणे यांना दणका; अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 12:19 PM2022-01-17T12:19:01+5:302022-01-17T12:26:14+5:30
जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी दरम्यान १८ डिसेंबर रोजी कणकवली येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेण्या हल्ला झाला होता.
सिंधूदुर्ग/ मुंबई: आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिन उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आज उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली. तसेच अन्य सहआरोपी मनीष दळवीच्या अटकपूर्व जामिनाला उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
Bombay High Court refused anticipatory bail to Maharashtra BJP MLA Nitesh Rane in connection with an alleged attempt to murder case.
— ANI (@ANI) January 17, 2022
Anticipatory bail of another co-accused Manish Dalvi allowed by High Court.
जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी दरम्यान १८ डिसेंबर रोजी कणकवली येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेण्या हल्ला झाला होता. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणी अटक होऊ नये म्हणून राणे पसार झाले होते. जिल्हा न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
तब्बल १८ दिवसांनी माध्यमांसमोर
सदर प्रकरणी अटक होऊ नये, यासाठी राणे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत हे २७ डिसेंबरपासून भूमिगत झाले होते. त्यानंतर नॉट रिचेबल असलेले आमदार राणे जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडीवेळी १८ दिवसांनी अचानक समोर आले होते.
कणकवलीत मोठा पोलीस बंदोबस्त
उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. त्यामुळे कणकवली शहरामध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. निकाल काही लागला तरी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस सतर्क असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये कणकवली शहरात इतर तालुक्यातील पोलीस अधिकारी व कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस कर्मचारी मागवले असल्याचे दिसत आहे.