कुडाळ : कुडाळ तालुका बचाव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या महामार्ग बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कुडाळ शहरातील महामार्गावर तसेच तालुक्यात अन्य चार ठिकाणी दिड ते दोन तास छेडलेल्या महामार्ग बंद आंदोलनामुंळे अनेक वेळा वाहतुक ठप्प झाली होती.
हे आंदोलन करून महामार्ग बंद केल्या प्रकरणी समितीच्या सुमारे ५९ आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी समितीच्या वतीने देत प्रशासनाचा निषेध ही व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजपाचे जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर, जिल्हा परीषद सदस्य संजय पडते, अमरसेन सावंत, माजी सभापती सुनील भोगटे, माजी जि. प. सदस्य संजय भोगटे, सभापती राजन जाधव, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे लोकसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष आनंद शिरवलकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उप सभापती श्रेया परब, राजन बोभाटे, पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, नगरसेवक सचिन काळप, गणेश भोगटे, बाळा वेंगुर्लेकर, नगरसेविका संध्या तेर्से, प्रज्ञा राणे, मेधा सुकी, बाळा कोरगावकर, स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी अस्मिता बांदेकर, आना भोगले, रूपेश कानडे, रूपेश बिड्ये, प्रशांत राणे, भाऊ शिरसाट, मनसेचे प्रसाद गावडे, चैताली भेंडे, सुप्रिया मेहता, माजी सभापती प्रतिभा घावनळकर, चंद्रकांत अणावकर, सी. टी. कोचरेकर, शरद कांबळी, दादा मस्के, निलेश आळवे, शेळके, निता राणे, अस्मिता बांदेकर, सदानंद अणावकर, आपा भोगटे, संजय बोभाटे, बाबल गावडे, दिपक गावडे, राजन नाईक, सतीश कुडाळकर, शरद परब, भास्कर परब, राजु तेंडोलकर, विजय प्रभु, संजय वेंगुर्लेकर, सुश्मित बांबुळकर, डॉ. अभय सामंत, अतुल सामंत, द्वारकानाथ डिचोलकर, शिल्पा घुर्ये, आत्माराम ओटवणेकर, वर्षा कुडाळकर, नितीन शिरसाट, सर्फराज नाईक, स्नेहाकिंता माने, बाळ कनयाळकर, शिल्पा बिले, परशुराम गंगावणे, मनोहर आंबेकर, तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षाचे तसेच संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने या आंदोलना मध्ये सहभाग घेतला होता.
कुडाळ येथील महामार्ग बंद आंदोलनाच्या सुरूवातीला सर्वांनी एकत्र येत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत राज हॉटेल येथील महामार्गावर महामार्ग बंद आंदोलन छेडले. तसेच सर्वांनी महामार्गावरून रॅली काढत आर.एस. एन. हॉेलकडे पुन्हा महामार्ग बंद आंदोलन छेडले.या सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस सरसावले मात्र यावेळी सर्व आंदोलनकर्त्यांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुंळे पोलिसांनी या आंदोलन कर्त्यांना उचलत पोलिस व्हॅन मध्ये कोंबले. गाडीत सुमारे १५ मिनिटे महामार्ग रोखुन धरल्याने वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.याच दरम्यान तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील महामार्गावर तेथील पंचक्रौशीतील आंदोलनकर्त्यांनी एकत्र येत मोठे सागाचे झाड महामार्गावर आडवे टाकत महामार्ग रोखुन धरला त्यामुंळे तेथे महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली. तर बिबवणे येथील महामार्गावर टायर जाळुन टाकत व झाराप व तेर्से बांबर्डे येथील आंदोलन कर्त्यांनी महामार्गावर उतरत महामार्ग बंद आंदोलन छेडले.पोलिसांची झाली धावपळसमितीच्या वतीने कु़डाळ येथेच आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र वेताळ बांबर्डे, बिबवणे, झाराप, तेर्सेबांबर्डे या ठिकाणी ही महामार्ग बंद आंदोलन छेडल्यामुंळे ठिकठिकाणी वाहतुक ठप्प झाली होती.
त्यामुंळे येथील आंदोलन कर्त्यांना आंदोलन करण्यापासुन रोखण्यासाठी व वाहतुक सुरळीत करण्यासाठी कुडाळ पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली होती मात्र काही वेळातच ठिकाणी पोलिसांनी पोहचत वाहतुक खुली केली.लेव्हल सर्कल झालेच पाहिजे : काका कुडाळकरकुडाळ येथील राज हॉटेल समोरील महामार्गावर बॉक्ससेल तसेच उड्डाण पुल न होता लेव्हल सर्कल व्हावे ही प्रमुख मागणी कुडाळ वासीयांची आहे तसेच आरएसएन हॉटेल समोरील महामार्गाच्या खालून भुयारी मार्ग तर बॉक्ससेल जिथे आहे तिथे पादचारी भुयारी मार्ग असावेत अशा मागण्या आमच्या असुन मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी काका कुडाळकर यांनी दिला.राजीव बिले यांनी सांगितले की, आपल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकार्यांनी समितीला पाठविलेले पत्र हे आंदोलनकर्त्यांची चेष्टा करणारे असल्याची खंत त्यांनी व्यक्त करीत मागण्या मान्य होई पर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले. यावेळी इतर सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत कुडाळ तालुक्यातील जनतेच्या अपेक्षांच्या विरोधातील महामार्ग चौपद्रीकरणाचे काम होवु देणार नसल्याचा इशारा यावेळी दिला.आंदोलनातील ठळक मुद्दे
- सकाळ पासुनच राज हॉटेल जवळील महामार्गाकडे आंदोलन कर्त्यांनी जमायला सुरूवात केली.
- स्पेशल पोलिस दलाच्या कमांडोची तुकडी बोलाविण्यात आली होती.
- महीलांचा ही मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभाग.
- जेष्ठ नागरीक पदाधिकार्यांचाही आंदोलनामध्ये सहभाग.
- आंदोलनाच्याच दरम्यान तुफान पाऊस
- तालुक्यात पाच ठिकाणी आंदोलन
- महामार्गावर वाहतुक अनेक वेळा ठप्प, वाहतुकीची कोंडी.