शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
2
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
4
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
6
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
7
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
8
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
9
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
10
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
11
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
12
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
13
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
14
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
15
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
18
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
19
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय

कुडाळमधील महामार्ग चौपदरीकरण वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2020 5:03 PM

vinaykraut, kudal, highway, sindhudurg कुडाळ येथील महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी कुडाळ नागरिकांच्या मागण्या विचारात घेऊनच येथील महामार्गाचे काम करण्यात येईल, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी कुडाळवासीयांना दिले. तसेच यावेळी उपस्थित महामार्गाच्या अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने महामार्गाचे काम करा. चुकीच्या पद्धतीने नकाशे व काम खपवून घेणार नसल्याचे सांगितले.

ठळक मुद्देकुडाळमधील महामार्ग चौपदरीकरण वादमागण्या विचारात घेऊन काम : विनायक राऊत

कुडाळ : कुडाळ येथील महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी कुडाळ नागरिकांच्या मागण्या विचारात घेऊनच येथील महामार्गाचे काम करण्यात येईल, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी कुडाळवासीयांना दिले. तसेच यावेळी उपस्थित महामार्गाच्या अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने महामार्गाचे काम करा. चुकीच्या पद्धतीने नकाशे व काम खपवून घेणार नसल्याचे सांगितले.कुडाळ शहरातून जाणाऱ्या महामार्गावर चौपदरीकरणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात राज हॉटेल व आरएसएन हॉटेल येथे अनेक प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत येथील नागरिकांनी तसेच कुडाळातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली.दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले खासदार राऊत यांनी या दोन्ही ठिकाणांची पाहणी बुधवारी सायंकाळी केली.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, सुनील भोगटे, तालुकाप्रमुख राजन नाईक, संजय भोगटे, संतोष शिरसाट, विकास कुडाळकर, अतुल बंगे, रुपेश पावस्कर, मंदार शिरसाट, नगरसेवक सचिन काळप, राजू गवंडे, तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, बांधकाम विभागाच्या अनामिका जाधव, ठेकेदार कंपनीचे अधिकारी तसेच भूधारक, विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी येथील भूधारकांनी राज हॉटेलकडे करण्यात येणाऱ्या बॉक्सवेलचे काम हे चुकीच्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना त्यांच्या घरी व दुकानांकडे जाण्यासाठी रस्ताच ठेवला नसल्याची तक्रार केली. या जागेची पाहणी करून खासदार राऊत यांनी येथील नागरिकांना त्यांच्या मागणीप्रमाणे रस्ता करून द्यावा. त्यासाठी योग्य तो नकाशा बनवा, असे आदेश अधिकारी व ठेकेदार यांना दिले.अपमान सहन करणार नाही : कुडाळकरयावेळी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कुडाळ तालुक्यातील ९० टक्के काम पूर्ण झाले. मात्र, येथील काम कुडाळवासीय बंद पाडतात, असे सांगताच काका कुडाळकर संतप्त झाले. कुडाळ वासीयांनी कधीच काम बंद पाडले नाही, सहकार्य केले. उगाच जनतेचा अपमान करू नका. अपमान सहन करणार नाही, असे कुडाळकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्ग