कणकवली : महामार्गावर कळशीतून पाणी ओतण्याचा इशारा आम्ही कणकवलीकरांनी दिला होता. कणकवलीकरांच्या या आंदोलनापूर्वीच मध्यरात्री महामार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. यामुळे शहरवासीयांची धुळीतून काहीशी मुक्तता झाली आहे, तर आम्ही कणकवलीकरांनीही आपले आंदोलन स्थगित केले आहे.
कणकवली शहरातील मुंबई-गोवा महामार्गावर सिमेंट, खडीची प्रचंड धूळ उडत असल्याने वाहन चालकांसह नागरिक त्रस्त झाले होते. महामार्ग ठेकेदाराला पाणी मारण्याचे आवाहन करून देखील टँकरच्या माध्यमातून पाणी आणले जात नव्हते. त्यामुळे संपूर्ण कणकवलीकरांनी आम्ही कणकवलीकर या संस्थेच्या माध्यमातून एकत्र येत आज महामार्गावर कळशीतून पाणी ओतण्याचा इशारा दिला होता.
मात्र कणकवलीकरांच्या या आंदोलनापूर्वीच मध्यरात्री महामार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. यामुळे शहरवासीयांची धुळीतून काहीशी मुक्तता झाली आहे. तर आम्ही कणकवलीकरांनीही आपले आंदोलन स्थगित केले आहे.