शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

ऐतिहासिक ‘डाळपस्वारी’ला शाही थाटात सुरूवात

By admin | Published: April 09, 2015 10:44 PM

श्री देव रामेश्वर संस्थान : आचरा परिसरात भक्तीमय वातावरण

आचरा : तीन वर्षांनी होणाऱ्या इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या डाळपस्वारी उत्सवाला तोफांच्या सलामीने आणि हजारो भाविकांच्या साक्षीने गुरुवारपासून सुरुवात झाली. या उत्सवाची सुरुवात श्रींची स्वारी इतर तरंगासह पाच स्थळांना भेट देऊन दळ डाळपी समजावून बाहेर पडतोय..., ज्याचा वचन देतंय ता खरा करून अवसारी पाषाणी गणित एक करून रामेश्वराला सांगणे करून करण्यात आले.रामेश्वर मंदिराच्या आवारातील डाळप झाल्यानंतर तोफांच्या सलामीने व ढोलताशांच्या गजरात रवळनाथ, पावणाई, काळकाई, विठलाई आदी देवतांचे तरंग धावत रामेश्वर घाटीपर्यंत गेले. यानंतर रामेश्वर आणि पूर्वज वाजत गाजत घाटीपर्यंत आल्यावर तिथूनच लोकांची गाऱ्हाणी व ओट्या भरण्यास सुरुवात झाली. नंतर आचरा घाटी बाजारपेठमार्गे ‘श्रीं’ची स्वारी फुरसाई मंदिरात आली. तिथे आल्यावर मोठे डाळप करून भाविकांचे गाऱ्हाणे ऐकत मिराशीवाडी येथील डाळप करून सायंकाळी उशिरा ‘श्रीं’ची स्वारी नागझरी येथील गिरावळ मंदिरात विसावली. उत्सवात सहभागी झालेल्या भाविकांसाठी मुंबईस्थित वास्तुशास्त्रज्ञ मधुकर लाड, संजय घाडी मित्रमंडळ, पर्डेकर मित्रमंडळ, व्यापारी मंडळ, मिराशीवाडी ग्रामस्थ, शेखर मोर्वेकर आदींतर्फे ठिकठिकाणी अल्पोपहार, शीतपेयांची व्यवस्था करण्यात आली होती. केंद्रशाळा आचरा नं. १ येथील कथामालेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. सात दिवस चालणाऱ्या उत्सवात चाकरमान्यांनी हजेरी लावली होती. (वार्ताहर)५भंडारवाडीमध्ये ‘श्रीं’ची स्वारी; स्वागताची तयारी पूर्णइनामदार श्री देव रामेश्वराच्या संस्थानी थाटाच्या डाळपस्वारीला गुरुवारपासून सुरुवात झाली असून बाजारपेठ फुरसाई मंदिर मिराशीवाडी ब्राह्मण, श्री देवी गिरावळ येथील डाळपे केल्यानंतर १० एप्रिल रोजी ‘श्रीं’च्या स्वारीचे आगमन आचरा भंडारवाडी, बौद्धवाडी येथे होऊन रात्री उशिरापर्यंत गाऊडवाडी येथील श्री देव ब्राह्मणदेव मंदिरात ‘श्रीं’च्या स्वारीचा मुक्काम होणार आहे. गुरुवारी श्री देवी गिरावळ मंदिरातील रास पोटाळण्याचा विधी झाल्यानंतर सायंकाळी ‘श्रीं’च्या स्वारीचे आगमन आचरा भंडारवाडी, बौद्धवाडी महारथळ येथे होणार असून आचरा काझीवाडा, शेख मोहल्ला या मार्गे श्री देव ब्राह्मणदेव मंदिर आचरा गाऊडवाडी येथे रात्री उशिरा ‘श्रीं’ची स्वारी मुक्कामी पोहोचणार आहे.