अमोल गोसावीचौके : गेले काही दिवस सतत कोसळत असलेल्या पावसाचा फटका मंगळवारी रात्री काळसे गोसावीवाडीला बसला. अतिवृष्टीमुळे मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी रात्री १०:३० वाजता गोसावीवाडीतील सीताराम भगवान गोसावी यांच्या घरासमोरील दगडी संरक्षक भिंत कोसळली. ही भिंत समोरील जाण्या-येण्याच्या वाटेवर कोसळल्याने वाट बंद झाली होती.यासोबतच घरासमोरील अंगणाचा काही भागही कोसळून सीताराम गोसावी यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. या पडझडीमुळे सीताराम गोसावी यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती काळसे तलाठी नीलम सावंत, ग्रामसेवक पी. आर. निकम, पोलिस पाटील विनायक प्रभू यांना दूरध्वनीवरून देण्यात आली त्यानंतर कोतवाल प्रसाद चव्हाण यांनी प्रत्यक्ष दुर्घटनास्थळी येऊन नुकसानीची पाहणी केली.
सिंधुदुर्गातील काळसे गोसावीवाडीला अतिवृष्टीचा फटका; संरक्षक भिंतीसह अंगणाचा भाग कोसळला
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 17, 2024 6:27 PM