शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बेवारस बोटींची होळी करा

By admin | Published: March 24, 2016 11:25 PM

मच्छिमार पुन्हा संतप्त : बोटींवर कारवाई नाही

मालवण : मालवण किनाऱ्यावर केरळ मासेमारीवरून सुरु असलेला वाद थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसून येत नाही. किनाऱ्यावर बेवारस स्थितीत सापडून आलेल्या काही बोटींवर मत्स्य विभागाने पंचनामे करून नोटिसा चिकटवल्या व २२ मार्चपर्यंत बोट मालकांनी कागदपत्रे सादर करावीत. अन्यथा कारवाई करण्यात येईल. असे नमूद करण्यात आले होते. मात्र २२ तारीख उलटून गेली तरी या बोटींवर कोणतीही कारवाई न झाल्याने स्थानिक मच्छिमार पुन्हा संतप्त झाले. व मत्स्य अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी रत्नागिरी येथे असल्याचे सांगितले व परवाना अधिकारी वेंगुर्ले येथे गेल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मच्छिमारांच्या संतापात भर पडली. या बोटींवर दिवसभरात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सहाय्यक मत्स्य आयुक्त विजय कांबळे यांच्याशी दूरध्वनीवरून बोटींवर कारवाईची मागणी करण्यात आली. अधिकारी वर्गाकडून सायंकाळपर्यंत कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले. गेले अनेक दिवस बेवारस स्थितीत काही नौका पडून आहेत. काही नौकांवर नोटीसा चिकटविल्या त्या मासेमारीस गेलेल्या आहेत. त्यामुळे मत्स्य विभागाच्या कार्यवाहीबाबत मच्छिमारांनी संताप व्यक्त केला. सहाय्यक आयुक्त यांच्याकडे रत्नागिरी येथील चार्ज आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार ते रत्नागिरी येथे असतात. (प्रतिनिधी)मागणी : मच्छिमारांना न्याय द्यापुढील तीन दिवस ते सिंधुदुर्गात राहणे अपेक्षित आहे. मात्र, सलग सुट्या आल्यामुळे व सोमवारपासून पुन्हा ते रत्नागिरीस गेल्यास कारवाई होणार कशी? आज होळी उत्सव आहे. त्यामुळे या बेवारस बोटींची मत्स्य विभागाने होळी करावी व मच्छिमारांना न्याय मिळवून द्यावा, असे मच्छिमारांच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी विकी तोरसकर, राजू आंबेरकर, महेश देसाई, बाबी जोगी यांच्यासह अन्य मच्छिमार उपस्थित होते.