शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

खारफुटीच्या जंगलात खेकडा प्रकल्पाची आशा

By admin | Published: August 18, 2015 10:59 PM

बाणकोट ते दाभोळ : खेकडा संवर्धनातून मिळणार रोजगाराच्या संधी

शिवाजी गोरे -दापोली  समुद्र किनाऱ्यावरील खारफुटी निसर्गाचे वरदान असून, खारफुटीमुळे समुद्राचे आक्रमण रोखले जाऊन अनेक जीवजंतूंच्या उत्पत्तीत वाढ होते. अलिकडच्या काळात काही ठिकाणी समुद्राच्या पाण्याने अतिक्रमण केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची भातशेती नष्ट होऊन खारफुटीची जंगले वाढली आहेत. अशा जंगलांचा वापर करुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले असून, बाणकोट ते दाभोळ १०० किलोमीटरच्या गावात ठिकठिकाणी खेकडा संवर्धन प्रकल्प राबवून खारफुटीच्या संवर्धनाबरोबरच खेकडा प्रकल्प मार्गी लागणार आहे.भारत सरकारच्या कांदळवन विभागामार्फत वन विभागाच्या देखरेखीखाली हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. दाभोळ ते बाणकोट दरम्यानच्या ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन चिखलातील खेकडा संवर्धन, खारफुटीतील मधुमखी पालन, समुद्र वनस्पती प्रकल्प राबवण्यात येणार असून, या प्रकल्पातून येत्या पाच वर्षात ५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सुरुवातीच्या काळात सरकारी जागेत हा पायलट प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. स्थानिकांना या प्रकल्पाद्वारे ट्रेनिंग, मार्गदर्शन शिबिर, प्रात्यक्षिके देण्यात येणार आहेत. भारतामध्ये साबण व टुथपेस्ट बनवणाऱ्या काही कंपन्या वनस्पतीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. अशा प्रकारची वनस्पती समुद्र किनाऱ्यावरील खारफुटीच्या जंगलात आढळून येते. समुद्र वनस्पतीचा वापर अनेक कंपन्या करु लागल्या आहेत. काही गावांमध्ये परसबाग उद्ध्वस्त होऊन त्या ठिकाणी खारफुटीने जागा घेतली आहे. मात्र, खारफुटी तोडण्यास बंदी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्याचे होणारे नुकसान लक्षात घेता त्या शेतकऱ्याना पर्यायी उद्योग उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. खारफुटीचे संवर्धन व पर्यायी शेती हा उपाय शेतकऱ्यापुढे राहिल्यास शेतकऱ्याला खारफुटीच्या जंगलातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. स्थानिकांच्या रोजगाराचा व पर्यावरण रक्षणाचा विचार करुन समुद्र किनाऱ्यावरील गावात खेकडा, मधुमखी पालन प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. याकरिता बाणकोट, केळशी, आंजर्ले, दाभोळ, आडे, उटंबर या गावातील ग्रामसभांना भेट देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. दाभोळ ते बाणकोट या गावातील समुद्र किनाऱ्यावरील गावातील ग्रामस्थांचे शंकासमाधान करण्यात येत असून, आंजर्ले, केळशी, वेळास, बाण्कोट, वेसवी या गावांतील ग्रामसभेत या प्रकल्पाबद्दल माहिती देण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा प्रकल्प अधिकाऱ्याने दिले असून ग्रामसभेत या प्रकल्पाबद्दल एकमत होऊन स्थानिकांनी संपूर्ण सहकार्य करण्याचा ठरावसुद्धा ग्रामसभेत केला. आंजर्ले ग्रामसभेत ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देऊन ग्रामस्थांचे समाधान करण्यात आले. खेकडा प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार मिळणार असून, ६०० ते १५०० ग्रॅम वजन सहा ते आठ महिन्यात होते. याची किंमत सुमारे १ हजार ते १२०० रुपये असणार आहे. या प्रकल्पातून महिला बचतगट, तरुण, सुशिक्षित बेकार स्त्री, पुरुष यांना रोजगार मिळणार आहे. शेतकऱ्याच्या खासगी शेतीत खारफुटीने आक्रमण केल्यामुळे शेतीपासून वंचित होण्याची वेळ शेतकऱ्यावर आली होती. खारफुटीने शेती नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. परंतु या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. प्रकल्पामुळे शेतीतसुद्धा हा प्रकल्प राबविण्यास पुढे येतील. भविष्यात स्थानिकांना याचा फायदा होईल.- राजेश जैन,प्रगतशील शेतकरी, आंजर्ले