बांदा : सीआरझेड कायद्याचा फटका सावंतवाडी तालुक्यातील खाडीपात्रालगतच्या १५ गावांना बसला आहे. यातील सर्वाधिक फटका वेगाने विकसीत होणाऱ्या बांदा शहराला बसला आहे. मात्र, आता नव्या निकषाप्रमाणे ५00 मिटरवरून हद्द १00 मिटरवर आल्याने या गावांच्या विकासाबाबत आशा निर्माण झाली आहे.सावंतवाडी तालुक्यातील बांदा, किनळे, मडुरा, नाणोस, सातार्डा, सातोसे, सावरजुवा, शेर्ले, तळवणे, तिरोडा, आजगाव, आरोंदा, भटपावणी, कास, कवठणी या गावांना बसला आहे. या गावांमधील सर्वाधिक परिसर हा या कायद्यात सापडल्याने येथील विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. बांदा शहराचा समावेश हा सीआरझेड १ बी व सीआरझेड ३ मध्ये करण्यात आला आहे. शहरातील ५१६६.३२ स्क्वेअर मिटर परिसर हा सीआरझेड १ बी मध्ये तर २४१0९६.0८ स्क्वेअर मिटर परिसर हा सीआरझेड ३ मध्ये सामाविष्ट करण्यात आला आहे. इतर गावांमधील परिसराची देखिल सीआरझेडच्या कायद्यानुसार वर्गवारी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)बांदा गावाला शहर म्हणून मान्यता मिळाल्याने येथील व्यापारी पेठ व बांधकामांचे वेगाने विस्तारीकरण होत आहे. सीआरझेड कायद्यामुळे खिळ बसली आहे. सीआरझेड कायद्याचा सर्वाधिक फटका हा बांदा शहराला बसला आहे. यामुळे सीआरझेडचे नियम लावताना बांद्याला शहराचे निकष लावणे गरजेचे आहे. यासाठी बांदा शहराचा समावेश सीआरझेड ३ मधून सीआरझेड २ मध्ये करावा यासाठी जास्तीत जास्त हरकती नोंदविण्यात येणार आहेत.- मंदार कल्याणकर, सरपंच बांदासीआरझेड कायद्याविषयी१९९१ साली सीआरझेड कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार शहरी व ग्रामीण अशी वर्गवारी करण्यात आली आहे. तसेच ज्याठिकाणी नदिपात्राला गावातील अंतर्गत रस्ते हे समांतर आहेत त्याठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही. गावातील परिसराप्रमाणे या गावांचे सीआइझेड १ अे, सीआरझेड १ बी, सीआरझेड २, सीआरझेड ३ असे वर्गीकरण करण्यात आले आहे. सीआरझेड १ बी मध्ये नदिपात्राला येणाऱ्या भरतीची न्यूनतम ते उच्चतम रेषा यामधील येणरा भाग, सीआरझेड २ मध्ये १00 मीटर रेषेतील ५0 टक्के भाग हा बांधकामांसाठी वापरण्यायोग्य तर सीआरझेड ३ मध्ये नदिपात्रालगतचा संपूर्ण अविकसीत भाग यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील नियम व अटी या जाचक असून यामुळे सर्वसामान्य जनता भरडली गेली आहे.
नव्या नियमांमुळे विकासाबाबत आशा
By admin | Published: November 19, 2015 10:26 PM