मालवण : तालुक्यातील हडी येथील शाळा क्रमांक २ जवळील लवू कावले यांच्या घरास शुक्रवारी रात्री शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली. या आगीत घराचे वासे तसेच अन्य साहित्य जळून खाक झाले.
यात कावले कुटुंबीयांचे सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात स्थानिक ग्रामस्थ, अग्निशमन बंबास यश मिळाले.याबाबत मिळालेली माहिती अशी की, हडी शाळा क्रमांक २ येथे कावले कुटुंबीयांचे चार बिऱ्हाडांचे एकत्रित घर आहे. यात सध्या दोन बिऱ्हाडे वास्तव्यास आहेत. यातील रमेश कावले यांचे कुटुंबीय शुक्रवारी काही कामानिमित्त बाहेर गेले होते तर लवू कावले यांचे कुटुंबीय घरातच होते. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने अचानक घरास आग लागली.
घर कौलारू असल्याने वाशांनी पेट घेतला. आग लागल्याचे दिसताच घरातील लहान मुलांसह अन्य मंडळी घराबाहेर पडली. त्यांनी तत्काळ गावातील मंडळींना आग लागल्याची माहिती देताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मालवणातील नगरसेवक यतीन खोत यांना देताच त्यांनी तत्काळ नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्याशी संपर्क साधून अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना केला.हडीचे सरपंच महेश मांजरेकर, संतोष सावंत यांच्यासह अन्य स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. मात्र, आगीचा भडका उडाल्याने घरातील दूरदर्शन संच, फ्रीज तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक्स साहित्यतसेच गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले.दीड तासानंतर आगीवर नियंत्रणमालवण पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. कौलारू घर असल्याने घराचे वासे तसेच अन्य साहित्य जळून कावले कुटुंबीयांचे सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
मालवण पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. कौलारू घर असल्याने घराचे वासे तसेच अन्य साहित्य जळून कावले कुटुंबीयांचे सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.