सावंतवाडी : उच्च न्यायालयाचे निर्बंध असताना आंबोलीत वनउत्तर कामे होतातच कशी? तसेच मार्चमध्ये पैसे खर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे काढली आहेत का? असा सवाल करत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी वनविभागाला धारेवर धरले.यावेळी मनसे संपर्कप्रमुख भास्कर परब, तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे, राजू कासकर, संतोष भैरवकर, विनोद पोकळे, सुशील दळवी आदी उपस्थित होते. माजी आमदार उपरकर यांनी महामार्गाला देण्यात आलेल्या परवानगीमध्ये अटी व शर्ती पूर्ण केल्या जात आहेत याची खात्री केली का? असा सवाल केला. तसेच सोनवडे घाट मार्गाबाबतही माहिती घेतली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे.ही वृक्षतोड थांबावी यासाठी प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. तर उच्च न्यायालयाचे निर्बंध असताना आंबोलीमध्ये वनविभाग कशी काय कामे करते? सिमेटचे जंगल उभारायचे आहे का? आंबोली विश्रामगृहाच्या तीन निविदा कशा काय काढण्यात आल्या? असे सवालही यावेळी उपरकर यांनी केले.यावर उपवनसंरक्षक चव्हाण यांनी वेगवेगळी कामे असल्याने आम्ही तसा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले. यावेळी वेत्ये येथील वृक्षतोड तसेच इतर अनेक विषयावर उपवनसंरक्षक चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी सहाय्यक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक, वनक्षेत्रपाल गंगाधर पाणपट्टे, दिगंबर जाधव, संतोष कोकितकर आदी उपस्थित होते.
आंबोलीत सिमेंटचे जंगल कसे?, परशुराम उपरकर : वनअधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 11:10 AM
उच्च न्यायालयाचे निर्बंध असताना आंबोलीत वनउत्तर कामे होतातच कशी? तसेच मार्चमध्ये पैसे खर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे काढली आहेत का? असा सवाल करत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी वनविभागाला धारेवर धरले.
ठळक मुद्देआंबोलीत सिमेंटचे जंगल कसे? परशुराम उपरकर यांचा सवाल वनअधिकाऱ्यांना घेराव