शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

बेकायदा मद्य रोखणार कसे?

By admin | Published: January 09, 2016 12:03 AM

रत्नागिरी : उत्पादन शुल्क विभागाकडील पन्नास टक्के पदे रिक्तच...

प्रकाश वराडकर -- रत्नागिरी बेकायदा मद्य वाहतूक रोखण्याचे मोठे आव्हान उत्पादन शुल्क विभागापुढे आहे. मात्र, रत्नागिरी जिल्हा उत्पादन शुल्क विभागात मंजूर पदांपैकी निम्मी पदे बऱ्याच काळापासून रिक्त आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ६५ ते ७० टक्केपर्यंत पदे रिक्त आहेत. त्यामुळे महामार्गावरून व अन्य मार्गावरून होणाऱ्या बेकायदा मद्य वाहतुकीला रोखण्याचे मोठे आव्हान या अपुऱ्या यंत्रणेवर आहे. रत्नागिरी जिल्हा उत्पादन शुल्क विभागात गेल्या काही वर्षांपासून कर्मचारी संख्या कमी आहे. सध्या या विभागात एक उपविभागीय पोलीस अधिकारीपद रिक्त आहे. निरीक्षकांची सहा पदे मंजूर असून, त्यातील चार पदे अद्याप रिक्त आहेत. केवळ दोन निरीक्षकांना अतिरिक्त काम पाहावे लागत आहे. उपनिरीक्षकांची १३ पदे मंजूर असून, त्यातील ८ पदे रिक्त आहेत. ५ उपनिरीक्षक कार्यरत आहेत. कॉन्स्टेबल्सची ५० टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. १९ पदे मंजूर असून, केवळ ८ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. ११ पदे रिक्त आहेत. वाहनचालकांच्या ७ मंजूर पदांपैकी ३ पदे रिक्त आहेत. ४ वाहनचालक उपलब्ध आहेत. ८ मंजूर लिपिकांपैकी केवळ ३ कार्यरत आहेत. ५ पदे रिक्त आहेत. कार्यालय अधीक्षक, लेखापाल व लघुटंकलेखकाचे प्रत्येकी १ पद रिक्त आहे. मंजूर दोन वरिष्ठ लिपिकांमधील एक पद रिक्त आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उत्पादन शुल्क विभागाकडे मंजूर पदांपैकी केवळ ३० टक्के कर्मचारीच उपलब्ध आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई - गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर बेकायदा मद्याची वाहतूक होत असल्याचे रत्नागिरी विभागाने केलेल्या धडक कारवाईत उघड झाले आहे. त्याशिवाय गावठी दारुच्या भट्ट्याही या विभागाने गेल्या दोन वर्षांच्या काळात वारंवार उध्वस्त केल्या आहेत. अनेकांवर कारवाई केली आहे. बेकायदा मद्याची वाहतूक रोखण्यात अपुरे कर्मचारी असतानाही रत्नागिरी विभागाने चांगली कामगिरी केली आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरली गेल्यास महामार्गावरील बेकायदा मद्य वाहतुकीचे जाळे उद्ध्वस्त करणे शक्य होईल व शासनाच्या महसुलातही वाढ होईल. त्यामुळे रिक्त पदे भरून उत्पादन शुल्क विभाग अधिक सक्षम करण्याची मागणी होत आहे. सिंधुदुर्ग : सत्तर टक्के पदे रिक्त असल्याने कारवाई ठप्प...रत्नागिरी जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर अधीक्षक संतोष झगडे यांनी महामार्गावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे गोवा व अन्य ठिकाणाहून छुप्या पध्दतीने होणाऱ्या गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक रोखण्यात रत्नागिरी विभागाला गेल्या दोन वर्षात मोठे यश प्राप्त झाले आहे. केवळ महामार्गावरच नव्हे; तर कोकण रेल्वेच्या रो रो सेवेद्वारे जाणाऱ्या वाहनांमध्येही बेकायदा मद्याची वाहतूक पकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अशी बेकायदा वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या पार्श्वभूमीवर अधिक कारवाई होण्यासाठी रत्नागिरी विभागातील रिक्त पदे भरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.