शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

रुग्णांसाठी शेकडो वनौषधींची लागवड

By admin | Published: March 13, 2016 10:40 PM

आदर्शवत उपक्रम : आंबडोस येथील प्रताप पवार जपतायंत आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वारसा

अमोल गोसावी -- चौकेसर्वसाधारणपणे पारंपरिक शेती करता करता अधिक आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठी एखाद्या पिकाची आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतात. परंतु, वडिलांचा आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वारसा सांभाळताना केवळ आवड आणि जनसेवा म्हणून कोणत्याही आर्थिक फायद्याचा विचार न करता शेकडो औषधी वनस्पतींची लागवड आणि जोपासना करणारे मालवण तालुक्यातील आंबडोस देवळामागील वाडी येथील प्रताप लक्ष्मण पवार (वय ६२) हे या गोष्टीला अपवाद ठरत असून, त्यांचा उपक्रम आदर्शवत असाच आहे.प्रताप पवार यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९५४ साली झाला. सहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीसाठी १९७३ साली ते मुंबईला गेले. परंतु, आयुर्वेद क्षेत्राची आवड आणि वडिलांची वनौषधी उपचार पद्धतीची परंपरा पुढे चालू ठेवून लोकांची सेवा करण्याच्या हेतूने १९७७ साली ते पुन्हा गावी आले. औषधोपचारात वडिलांना मदत करता करता सर्व आयुर्वेदिक औषधांची माहिती घेऊन, अभ्यास करून पूर्णवेळ यासाठी देण्यास सुरुवात केली.गेली २० वर्षे उपचार करता करता प्रताप पवार यांच्या डोक्यात विचार आला की, आयुर्वेदिक उपचारासाठी लागणारी दुर्मीळ वनौषधी ही घनदाट जंगलातच शोधावी लागते आणि दूरवर पायपीट करून ती एकत्र करून त्यापासून औषध तयार करावे लागते. त्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी या दुर्मीळ वनौषधींची लागवड आणि जोपासना त्यांनी घराच्या जवळच मोठ्या प्रमाणावर केली. दुर्मीळ वनस्पती मिळेल तेथून आणून पवार यांनी त्याची लागवड करण्यास सुरुवात केली. आजच्या घडीला प्रताप पवार यांनी घराशेजारी दीड एकर क्षेत्रात सुमारे १०८ दुर्मीळ वनौषधी वनस्पतींची जोपासना केली आहे. त्यापासून अनेक आजारांवर औषध दिले जाते. या बागेच्या जोपासनेसाठी पवार यांना वार्षिक दहा हजार रूपये खर्च येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रूग्णांना दिलेल्या औषधासाठी पवार कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाहीत. रूग्णाने स्वेच्छेने दिलेली रक्कम ते समाधानाने स्वीकारतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरील रूग्णांवर उपचार करून काही असाध्य आजारांपासून त्यांनी रूग्णांना मुक्ती दिली आहे. वैद्य प्रताप पवार यांनी लागवड केलेल्या वनौषधीपासून कॅन्सर, लकवा, नपुसंकपणा, काविळ, गर्भधारणा समस्या, स्वाईन फ्लू, हत्तीरोग, डेंग्यू, एड्स, दमा, मुडदूस, सर्पदंश, सांधेदुखी, पोटातील आजार यासारख्या आजारांवर औषध दिले जाते. दुर्मीळ वनस्पतींमध्ये संधिसुधा, मोड, कोट (कोलंजन), पिवळी, कापूर, तुळस, सापशिन, डोरली वांगी, भुईरिंगीण, भुई आवळा, पेवगा, काजरा, कोरफड, अश्वगंधा, ब्राम्ही, सर्पगंध, निली, मारंगी, धोतरा, सफेदगुंज, सफेद गोखरण, उपरसाळ, अनंतमूळ, गोडा बेरंड, मधुपर्णी, शतावरी, इंद्रायणी, सताप, हाडसांधी, तांबडा धोतरा, मंदार वृक्ष, काळवेल, गुळवेल, अमरवेल, कृष्णतुळस, कांचन, अडुळसा, आघाडा, बेल, चंदन, बेडकी, समुद्रमंथन या आणि इतर अशा मिळून १०८ वनस्पतींची जोपासना पवार यांनी केली आहे. प्रताप पवार या वनस्पतींची विक्री करत नाहीत. एखाद्या असाध्य आजारावर मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी लाखो रूपयांची ऐपत नसणाऱ्या गरीब रूग्णांसाठी विनामूल्य औषधोपचार करणारे प्रताप पवारांसारखे वैद्य देवासमान वाटत असतील, यात शंका नाही.आपल्यासारखे वैदू जिल्ह्यातील ग्रामीण भागात आहेत. परंतु, सर्वच्या सर्व शेतकरी असल्यामुळे ते दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांच्याकडील ज्ञानही त्यांच्यासोबत संपेल, म्हणून जिल्ह्यातील सर्व वैदूंना एकत्र करून त्यांच्याकडील ज्ञानाची देवाणघेवाण करून पवार यांनी वैदुंना संघटीत करण्यास सुरुवात केली. २९ एप्रिल २०१३ साली वैद्य संदीप तळगावकर, नारायण पार्टे, प्रमोद कांबळे, गोपाळदास सरमळकर, सुधाकर सावंत, दिनेश ठाकूर, चंद्रशेखर कदम यासारख्या अन्य वैद्यांना सोबत घेऊन ‘जिज्ञासा धन्वंतरी वनौषधी संस्थे’ची स्थापना केली. ही जिल्ह्यातील पहिली नोंदणीकृत वैदू संस्था असून, आत्तापर्यंत या संस्थेत १८८ वैदुंनी नोंद केली आहे आणि आपल्याकडील ज्ञानाची देवघेव केली आहे. वैदुंनी आपल्या मागण्या संघटीतपणे शासनासमोर ठेवल्यास शासनाला विचार करणे भाग पडेल, अशी पवार यांना खात्री आहे. कोकणात पर्यायाने सिंधुदुर्गात मातीचे सोने करणारे लोक आहेत. पायाखाली तुडवल्या जाणाऱ्या वनस्पतींचे महत्त्व सर्वांना समजावं, प्रदूषण आणि जंगलतोडीमुळे नष्ट होत चाललेल्या काही दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन व्हावे आणि ग्रामीण भागातील वैदिक ज्ञान एकत्र येऊन त्यांचा गोरगरीब रूग्णांना फायदा व्हावा म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. आपल्याकडील जंगलात शेकडो वनौषधी आहेत. त्यांचे आज संवर्धन केले नाही तर भविष्यात फार मोेठ्या समस्या उभ्या राहतील. म्हणून त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. पृथ्वीवर एक अशी वनस्पती आहे की, जी गावात किंवा गावापासून सात मैलाच्या परिसरात असल्यास त्या गावात साथीचे रोग प्रवेश करत नाहीत. ही वनस्पती म्हणजे ‘पित्त आवळा’. कोकणात ही विपुल प्रमाणात सापडते. म्हणून यावर संशोधन होणे गरजेचे आहे, असे पवार यांनी सांगितले. आयुर्वेद ही श्रेष्ठ उपचार पद्धती असून, नेमका आजार ओळखण्याची ताकद फक्त वैद्यामध्येच आहे. म्हणूनच शासनाकडून वनौषधीचे सवंर्धन झाले पाहिजे आणि वयोवृद्ध वैद्यांना पेन्शनही दिली गेली पाहिजे, असे ते म्हणतात.