राजापूर : मंगळवारी रात्री झालेल्या चक्रीवादळामध्ये तालुक्यातील सुमारे पन्नास ते साठ गावांतील सुमारे दीड हजारांच्या आसपास घरांचे पूर्णत: व अंशत: नुकसान झाले असून, सुमारे तीन कोटी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. हसोळ मुसलमानवाडीतील अकबर मीर यांच्या घरावर वडाचे झाड पडल्याने त्यांची भावजय रुक्साना सुलेमान मीर (वय ४२) ही महिला जागीच ठार झाली, तर अन्य दोन गंभीर व एक जण किरकोळ जखमी झाले आहेत. यातील दोन गंभीर जखमींना रत्नागिरीत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गेल्या पंधरा दिवसांत अवकाळी पावसाने राजापूर तालुक्याला दुसऱ्यांदा दणका दिला. मंगळवारी सायंकाळी अचानक आलेल्या चक्रीवादळाने तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांची चांगलीच दाणादाण उडवून दिली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातून आलेले हे चक्रीवादळ हसोळ मुसलमानवाडीतील मीर कुटुंबीयांसाठी काळरात्रच ठरले. जुन्या घराचे बांधकाम करण्यासाठी ते कोसळवण्यात आल्याने मीर कुटुंबीयांनी आपला संसार बाजूच्याच वडाच्या झाडाखाली झोपडी काढून थाटला होता. अचानक आलेल्या चक्रीवादळाने हे वडाचे झाड पडून आपला भाऊ अकबर मीर याच्या कुटुंबीयांसह राहणाऱ्या सुलेमान मीर यांची पत्नी रुक्साना ही जागीच ठार झाली, तर सुलेमान मीर यांची मुलगी शाबीरा ही किरकोळ जखमी झाली आहे. अकबर मीर यांची अजमीन (१३) व अलमास (१0) ही दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. मीर कुटुंबीयांचे घर डोंगरमाथ्यावर (पान ८ वर)चक्रीवादळासह आलेल्या अतिवृष्टीचा फटका घरांप्रमाणेच शाळांनाही बसला. केळवली केंद्र्रातील अकरापैकी आठ शाळांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी संगणकासह शालेय साहित्याला मोठा फटका बसला आहे.
चक्रीवादळात तीन कोटींची हानी?
By admin | Published: April 28, 2015 11:35 PM