कणकवली : आगामी काळात एमएसएमई विभागाच्या माध्यमातून रोजगार, विकास, दरडोई उत्त्पन्न वाढविणे हे माझे ध्येय राहील. देशाच्या विकासाला सामूहिक योगदान असायला हवे. पंतप्रधानांनी टाकलेला विश्वास सार्थकी करून दाखवणे हा माझा निर्धार आहे. यापुढील काळात महाराष्ट्रातील प्रत्येक समस्या मार्गी लावण्यासाठी मी अग्रभागी असेन, असे प्रतिपादन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये महाराष्ट्रातील नवनियुक्त केंद्रीय मंत्र्याचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री नारायण राणे यांचा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना नारायण राणे बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात संधी दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऋण व्यक्त केले. महाराष्ट्रातील इतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड यावेळी उपस्थित होते. डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
महाराष्ट्रातील समस्या मार्गी लावण्यासाठी अग्रभागी राहीन :नारायण राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 2:12 PM
Dillhi NarayanRane Sindhudurg : आगामी काळात एमएसएमई विभागाच्या माध्यमातून रोजगार, विकास, दरडोई उत्त्पन्न वाढविणे हे माझे ध्येय राहील. देशाच्या विकासाला सामूहिक योगदान असायला हवे. पंतप्रधानांनी टाकलेला विश्वास सार्थकी करून दाखवणे हा माझा निर्धार आहे. यापुढील काळात महाराष्ट्रातील प्रत्येक समस्या मार्गी लावण्यासाठी मी अग्रभागी असेन, असे प्रतिपादन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.
ठळक मुद्देमहाराष्ट्रातील समस्या मार्गी लावण्यासाठी अग्रभागी राहीन : नारायण राणेनवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये राणे यांचा सत्कार