शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

CoronaVirus Lockdown : वेंगुर्ल्यातील चिन्मय मराठेची आयडियाची कल्पना, साकारले ट्री हाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 6:08 PM

लॉकडाऊनमुळे गार्डन, स्विमिंग पूल, पर्यटनस्थळे, विविध धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने लहान मुलांचा वेळ सध्या जाता जात नाही. यातूनच काही ठिकाणची मुले इनडोअर खेळांमध्ये रमली आहेत. पण खेळ, मोबाईल या सर्वाला फाटा देत वेंगुर्ला-भटवाडी येथील चिन्मय मराठे या शालेय मुलाने आपल्या कल्पक बुद्धिचा वापर करून ट्री हाऊस साकारले आहे. आपला बराचसा वेळ अशा नावीन्यपूर्ण उपक्रमामध्ये तो घालवित आहे.

ठळक मुद्देवेंगुर्ल्यातील चिन्मय मराठेची आयडियाची कल्पना, साकारले ट्री हाऊसकल्पक बुद्धिचा वापर, नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र होतेय कौतुक 

प्रथमेश गुरव वेंगुर्ला : लॉकडाऊनमुळे गार्डन, स्विमिंग पूल, पर्यटनस्थळे, विविध धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने लहान मुलांचा वेळ सध्या जाता जात नाही. यातूनच काही ठिकाणची मुले इनडोअर खेळांमध्ये रमली आहेत. पण खेळ, मोबाईल या सर्वाला फाटा देत वेंगुर्ला-भटवाडी येथील चिन्मय मराठे या शालेय मुलाने आपल्या कल्पक बुद्धिचा वापर करून ट्री हाऊस साकारले आहे. आपला बराचसा वेळ अशा नावीन्यपूर्ण उपक्रमामध्ये तो घालवित आहे.मे महिन्याची सुटी ही लहान मुलांना पर्वणीच असते. या सुटीत मुलांना घेऊन पालक दूरच्या नातेवाईकांकडे, लग्न समारंभाला तसेच वेगवेगळी पर्यटनस्थळे पहायला जाण्यासाठी छोटे-मोठे प्रवास करतात. बाहेर जाणे शक्य नसेल तर मुलांना आजूबाजूच्या गार्डनमध्ये नेणे, स्विमिंग पूल येथे पोहायला घेऊन जाणे किंवा घरीच मुलांसोबत विविध खेळ खेळत सुटीचा आनंद घेत असतात.

काही वर्षांपूर्वी अशा सुट्यांमध्ये गल्लीतील क्रिकेट, भातुकली यासह जे ग्रुपने खेळता येतील असे खेळ खेळताना लहान मुले दिसायची. त्यानंतर अलीकडे मोबाईलच्या विश्वात मोठ्यांप्रमाणेच लहान मुलेही मोबाईलवर गेम खेळू लागली. त्यामुळे सुट्यांमधील खेळ दिसणे हळूहळू कमी होऊ लागले.त्यातच सुटीतील काही तास मुलांना अभ्यास, खेळ सोडून अन्य परिसर ज्ञान समजावे यासाठी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत उन्हाळी वर्ग सुरू केले. यामध्ये मुलांना भविष्यासाठी आवश्यक असे ज्ञान देण्याची सोय आयोजक संस्थांनी केली.

यावर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन काळात गार्डन, स्विमिंग पूल, पर्यटनस्थळे बंद असल्याने लहान मुलांना करमणुकीची साधनेच नाहीत. तसेच प्रशिक्षण वर्गही घेता येत नसल्याने मुलांना पूर्ण वेळ हा घरच्या चौकटीतच घालवावा लागत आहे. तर काही मुले पुन्हा एकदा इनडोअर गेम्समध्ये रमली आहेत.मात्र, वेंगुर्ला-भटवाडी येथील चिन्मय मराठे या तिसरीतील विद्यार्थ्याने ट्री हाऊसच्या संकल्पनेनुसार आंब्याच्या झाडावरच एक छोटसे घर बनविले आहे. यासाठी त्याने मातीबरोबरच काही टाकाऊ वस्तूंचा वापर केला. आपल्या कल्पक बुद्धिमत्तेने त्या ट्री हाऊसमध्ये दिवा लावण्यासाठी जागा, झाडांच्या खोडातून खिडकीसह घराला छपराची मांडणी केली. या ठिकाणीच बसून तो काहीकाळ गोष्टींची पुस्तके वाचणे, अभ्यास करणे यात रमत आहे. ट्री हाऊसच्या बाजूला दोरी व टायरच्या सहाय्याने झोपाळाही बनविला आहे.घरातील उपलब्ध साधनसामुग्रीचा वापरचिन्मयने ही सारी संकल्पना पुणे येथील आपल्या मावसभावाला सांगितली. तसेच आपल्या ट्री हाऊसचे फोटोही शेअर केले. ते सारे पाहून त्यानेही आपल्या घरात उपलब्ध साधनसामुग्रीच्या सहाय्याने हाऊस बनविले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग