सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईची झळ बसत असल्याची ओरड गेले अनेक दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असताना टँकरने पाणी पुरवठा करण्याची एकमेव मागणी देवगड तालुक्यातील चाफेड गावाने केली आहे. त्याला प्रांताधिकारी यांच्या त्रिस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जलव्यवस्थापन समिती सभेत दिली. यामुळे टँकरमुक्तअशी सिंधुदुर्ग जिल्ह्याची असणारी ओळख पुसली गेली आहे.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची बैठक येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात समिती सभापती संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरेश जगताप, उपाध्यक्ष रणजीत देसाई, विषय सभापती जेरॉन फर्नांडिस, डॉ. अनिशा दळवी, पल्लवी राऊळ, अंकुश जाधव, उत्तम पांढरे, सावी लोके, प्रमोद कामत यांच्यासह अन्य अधिकारी खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.टँकरमुक्त असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पाण्याची पातळी जास्त खालावल्याने तसेच प्रशासनाने आचारसंहिता असल्याने पाणीटंचाई कामांना विलंबाने मंजूरी दिल्याने जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे.मात्र, अशा परिस्थितीत चाफेड या एका गावानेच टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. शासन आदेशानुसार याला मंजूरी देण्यासाठी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने चाफेडमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यास मंजूरी दिली आहे. यावेळी सभापती डॉ. अनिशा दळवी यांनी दोडामार्ग तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव करण्यात आला असल्याचे सांगितले. मात्र, आपल्या विभागाकडे अद्याप तसा प्रस्ताव आलेला नसल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी सांगितले.मिठबाव, हिंदळे, दहीबाव, नारिंग्रे परिसरात तीव्र पाणीटंचाईदेवगड तालुक्यातील चाफेड बरोबरच मिठबाव, हिंदळे, दहिबाव व नारिंग्रे परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे असा प्रश्न सदस्य सावी लोके यांनी उपस्थित करत जिल्हा पाणीपुरवठा विभाग सहकार्य करत नसल्याचे सांगितले. तर पाणीपुरवठा विभागाने संबंधित ग्रामपंचायती कागदपत्रे सादर करण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगितले.ग्रामपंचायतींकडून कागदपत्रे अपूर्णपाणी टंचाई आराखड्यातील २८० कामांना मान्यता मिळाली आहे. यापैकी ९९ कामांना कायार्रंभ आदेश देण्यात आले आहेत. ८७ कामे सुरू असून १२ काम पूर्ण झाली आहेत. तर ६४ ग्रामपंचायतीकडून कागदपत्रांची पुर्तता झालेली नाही. हातपंप नादुरूस्तीच्या ३४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीचे निरसन करण्यात आले आहे.
टँकरमुक्त सिंधुदुर्गची ओळख पुसली जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 6:22 PM
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईची झळ बसत असल्याची ओरड गेले अनेक दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असताना टँकरने पाणी पुरवठा करण्याची एकमेव मागणी देवगड तालुक्यातील चाफेड गावाने केली आहे. त्याला प्रांताधिकारी यांच्या त्रिस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जलव्यवस्थापन समिती सभेत दिली. यामुळे टँकरमुक्तअशी सिंधुदुर्ग जिल्ह्याची असणारी ओळख पुसली गेली आहे.
ठळक मुद्देचाफेड गावासाठी टँकरची मान्यता, प्रशासनाचा हिरवा कंदील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची माहिती