मालवण : आचरा येथे मच्छिमारांतील संघर्षाला पळपुटे आमदार व पुळचट पालकमंत्री जबाबदार आहेत. जनतेची या लोकप्रतिनिधीना चिंता नाही. बोटी पकडून माशांची लुट करणाऱ्या काही बेजबाबदार मच्छिमार पुढाऱ्यांमुळे मच्छिमारांचा विकास खुंटला असल्याची टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. मच्छिमारातील संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यास आपण तयार आहोत, असे राणे यावेळी म्हणाले. आचऱ्यातील संघर्षात पोलिसांनी योग्य दिशेने कार्यवाही केल्याबद्दल राणे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, संतोष आचरेकर, संजू परब, आंनद शिरवलकर, गुरुनाथ पेडणेकर, लीलाधर पराडकर, आबा हडकर, दीपक पाटकर, बबन मुंज, आशिष पाटील, कृष्णनाथ तांडेल आदी पदाधिकारी उपस्थित होते. राणे म्हणाले, गेल्या २५ वर्षात या मतदार संघाचे नेतृत्व करताना असा प्रसंग घडला नाही. कारवाईसाठी पुढे आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना अडविण्याची धमक आपण १९९० साली दाखवली होती. मात्र, आताच्या आमदारांमध्ये धमकही नाही आणि हिंमतही नाही. मच्छिमारांना आपण नेहमीच आधुनिकतेची कास दिली. त्यातून त्यांनी प्रगतीही साधली. सर्वच मच्छिमारांच्या पाठीशी आपण नेहमीच उभे राहिलो आहोत. यापुढे या संघर्षाचा परिणाम जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायावर होऊ नये. यासाठी मच्छिमारांत मध्यस्थी करण्यास आपण तयार आहोत, असेही राणे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) एक रूपयाही आणला नाही ४पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात एकही रुपयाचा निधी आणला नाही. गतवर्षी बजेटला कात्री लावण्यात आली. ४सर्वच बाबतीत जिल्ह्याचा विकास रखडला. सी वर्ल्डसह पर्यटन प्रकल्पात हे सरकार अपयशी ठरले असल्याची टीका नारायण राणे यांनी केली.
हल्यास आमदार, पालकमंत्री जबाबदार : राणे
By admin | Published: November 06, 2015 11:06 PM