मालवण : समाजात मनुवाद फोफावलेला आहे. समाजातील मनुस्मृतींचे उच्चाटन करण्यासाठी समाज प्रबोधन हे एक प्रभावी माध्यम आहे. आम्ही फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाज परिवर्तनासाठी शाहिरीच्या माध्यमाचा अवलंब केला आहे. समाज प्रबोधन करताना अनेक ठिकाणचे आमचे कार्यक्रम उधळून लावण्याचे प्रकारही वारंवार घडत आहे. त्यामुळे समाजातील विषमता नष्ट करणे हे मोठे आव्हान आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येवून लढा दिल्यास नक्कीच भारतात समानता नांदेल, असा विश्वास सुप्रसिद्ध शाहीर शितल साठे यांनी व्यक्त केला. मालवण येथे फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच महिला विभागाच्यावतीने भारतातील पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८४ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा प्रतिभा मालवणकर, महिला बालकल्याण सभापती पूजा करलकर, उत्कर्षा तामगावकर, विद्या जाधव, माधुरी जाधव, विशाखा कदम, विधिता देऊलकर आदी उपस्थित होत्या. एकता मालवणकर, साहिल जाधव, अमेय जाधव, वैभव मालवणकर, दिक्षा मालवणकर, प्रणय मालवणकर, श्रेयस गुळवे, प्रज्ञा गुळवे, प्रणाम तांबे, अंबाजी वलकर या विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास आपल्या विचारातून व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना गुळवे तर आभार भारती जाधव यांनी मानले. यावेळी फुले शाहू विचारमंचचे अध्यक्ष किशोर जाधव, सिद्धार्थ जाधव, पी. के. चौकेकर, बी. डी. बनसोडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद जाधव, रंजन तांबे, राजेंद्र्र कदम, बबन मालवणकर, रवी मालवणकर, नरेश वायंगणकर, पुरुषोत्तम मालवणकर, श्रीकांत मालवणकर, बंटी मालवणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
...तर भारतात समानता नांदेल
By admin | Published: January 05, 2016 12:10 AM