देवगड : कुणकेश्वर गावाकरिता कायमस्वरुपी स्वतंत्र तलाठी मिळावा व अन्य प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्यात या अनुषंगाने ग्रामपंचायत कुणकेश्वर व श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडे लेखी निवेदन शिष्टमंडळाने सादर केले. कायमस्वरुपी तलाठी न मिळाल्यास १५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडणार असल्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.यावेळी कुणकेश्वर सरपंच श्रुती बोंडाळे, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष किशोर पेडणेकर, उपसरपंच रमेश आईर, रामानंद वाळके, संजय वाळके, सुहास नाणेरकर, योगिता परब, जयदास नाणेरकर, उमेश वाळके, दिनेश धुवाळी, बाळकृष्ण मुणगेकर आदी उपस्थित होते.या चर्चेत कुणकेश्वर गावाकरिता कायमस्वरूपी तलाठी नेमण्यात येऊन शेतकरी सन्मान योजनेचा लाभ अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळाला नसून संबंधित फॉर्म भरून घेण्यात यावेत. त्याचप्रमाणे खरेदी खत व अन्य नोंदीचे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणीही या शिष्टमंडळाने तहसीलदार कांबळे यांच्याकडे केली.यावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास १५ आॅगस्ट रोजी उपोषण छेडण्याचा इशाराही शिष्टमंडळाने दिला आहे. या अनुषंगाने आपल्या न्याय मागण्यांकरिता योग्य ती कार्यवाही करण्यात येऊन तत्काळ कुणकेश्वर गावाकरिता दर सोमवारी व गुरुवारी तलाठी कार्यालयात संबंधित तलाठी उपस्थित राहून नागरिकांची कामे पूर्णत्वास नेतील, असे आश्वासन तहसीलदार कांबळे यांनी शिष्टमंडळाला दिले.
तलाठी न मिळाल्यास उपोषण, श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थानचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 2:50 PM
कुणकेश्वर गावाकरिता कायमस्वरुपी स्वतंत्र तलाठी मिळावा व अन्य प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्यात या अनुषंगाने ग्रामपंचायत कुणकेश्वर व श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडे लेखी निवेदन शिष्टमंडळाने सादर केले. कायमस्वरुपी तलाठी न मिळाल्यास १५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडणार असल्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.
ठळक मुद्देतलाठी न मिळाल्यास उपोषणश्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे तहसीलदारांना निवेदन