सागर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कटेंभ्ये : राज्यातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर कार्यरत असणाºया वर्ग दोनमधील २३ अधिकाºयांची सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षणाधिकारी वतत्सम शिक्षण सेवा वर्ग एक या पदावर नुकतीच नियुक्ती देण्यात आली आहे. पदोन्नतीने देण्यात आलेल्या नवीन नियुक्तीबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी शासनाने प्रसिद्ध केला आहे. विशेषबाब म्हणजे ऐन परीक्षेच्या काळातकोकण विभागीय मंडळात चारपैकी तीन पूर्णवेळ अधिकाºयांची पदे रिक्त असतानादेखील एकही नवीन अधिकारी कोकण विभागीय मंडळात नियुक्त करण्यात आलेला नाही.सध्या राज्यात बारावीची परीक्षा सुरू असून, दि. १ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षा काळात कोकण विभागीय शिक्षण मंडळात केवळ विभागीय सचिव हेच पूर्णवेळ कार्यरत आहेत. विभागीय सचिव आर. बी. गिरी यांच्याकडे कोकण विभागीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. यात भर म्हणून गिरी यांच्याकडे मुंबई विभागीय मंडळाचा अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.निरंतर विभागाचे शिक्षणाधिकारी आदिलशाह शेख यांना कोकण मंडळाचा सहायक सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. या सर्व प्रकारामुळे केवळ कोकण विभागीय मंडळाची पूर्णवेळ जबाबदारी असणारा एकही अधिकारी सध्या मंडळात कार्यरत नाही.अधिकाºयांचीतारेवरची कसरतविभागीय सचिव आर. बी. गिरी यांच्याकडे मुंबई मंडळाचा अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार असल्याने त्यांना आठवड्यातील काही दिवस मुंबई मंडळात उपस्थित राहावे लागते.तसेच सहायक सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार असणाºया निरंतर विभागाचे शिक्षणाधिकारी आदिलशाह शेख यांच्याकडे भरारी पथकाची जबाबदारी दिल्याने कार्यालयातील जबाबदारी सांभाळून त्यांना केंद्रभेट करावी लागते.या दोन्ही अधिकाºयांना मंडळाचे कामकाज पाहताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे.असे असतानादेखील शासनाकडून नवीन २३ पदोन्नत अधिकाºयांपैकी एकही अधिकारी कोकण विभागीय मंडळात न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोकण विभागीय मंडळ दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:28 PM