मालवण : कर्ली खाडीतील देवली पुलानजीक सध्या वाळू माफियांकडून अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे. यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून, या अवैध वाळू उपशाची महसूल विभागाने गांभीर्याने दखल घेत कारवाई करावी, अशी मागणी परुळे-चिपी कालवंडवाडी येथील भिकाजी पवार यांनी प्रांतांकडे निवेदनाद्वारे केली आहे.कर्ली खाडीपात्रातून गेले काही दिवस वाळू माफियांकडून बेसुमार वाळूची चोरी केली जात आहे. पुलापासून ५० मीटरच्या आत तसेच नीलक्रांती उपक्रमांतर्गत पिंजरा मत्स्य पालनाच्या प्रकल्पाजवळच मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू आहे. याकडे सातत्याने संबंधित विभागाचे लक्ष वेधूनही कोणतीही कारवाई झालेली नाही.वाळू उपशामुळे पुलाला धोकाअवैध वाळू उपशामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महसूल विभागाने याची गंभीर दखल घेत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पवार यांनी प्रांतांना सादर केलेल्या निवेदनासोबत वाळू उपसा सुरू असल्याची छायाचित्रे सादर केली आहेत.
कर्ली खाडीत अवैध वाळू उपसा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 12:56 PM
sand Sindhudurgnews-कर्ली खाडीतील देवली पुलानजीक सध्या वाळू माफियांकडून अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे. यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून, या अवैध वाळू उपशाची महसूल विभागाने गांभीर्याने दखल घेत कारवाई करावी, अशी मागणी परुळे-चिपी कालवंडवाडी येथील भिकाजी पवार यांनी प्रांतांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ठळक मुद्देकर्ली खाडीत अवैध वाळू उपसा सुरूच भिकाजी पवार यांनी वेधले प्रांतांचे लक्ष