कणकवली: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या नोटीसला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्राद्वारे उत्तर दिले आहे. मी केंद्रीय मंत्री असून पुढील दोन, तीन दिवस कामात व्यस्त आहे. त्यामुळे तशी आवश्यकता असल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बजावलेल्या नोटीसीबाबत मी जबाब नोंदवण्याचा तयार आहे. मी व्यस्त असल्यामुळे चौकशीला येऊ शकत नाही. अशा आशयाचे पत्र कणकवली पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिले.त्या पत्रात आपण अत्यंत व्यस्त असल्यामुळे चौकशीला येऊ शकत नाही. तसेच आणखी दोन, तीन दिवस व्यस्तता असणार असून त्या नंतर येऊ शकेन. आपण कॉन्फरन्सिंगवर माझा जबाब घेऊ शकता. असे म्हटले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
मी कामात व्यस्त, व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे जबाब नोंदविण्यास तयार; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पोलिसांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 7:07 PM