ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कोरोनाची भीतिदायक परिस्थिती आहे. जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या प्रश्नी सामना करावा लागत आहे. त्यातच जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ताब्यात दिलेल्या त्या रुग्णवाहिका जिल्हा परिषदेकडे पालकमंत्र्यांनी माघारी घेऊन केवळ उद्घाटनासाठी अडवून ठेवल्याने भाजपाने जिल्हा परिषद भवनासमोर ठिय्या आंदोलन केले.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या त्या कृतीबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांनी सहभाग घेतला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरोज परब, सावंतवाडी सभापती निकिता सावंत, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत व प्रसन्ना देसाई, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दीपक सुर्वे, संतोष गावकर, उपसभापती शितल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, शेर्ले सरपंच जगन्नाथ धुरी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, आडेली सोसायटीचे चेअरमन समीर कुडाळकर आदी उपस्थित होते.उद्घाटनाच्या श्रेयासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी वाशीहून व आरोग्य केंद्रांच्या ताब्यात गेलेल्या रुग्णवाहिका जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांमार्फत पुन्हा माघारी बोलावून घेतल्या. उद्घाटनासाठी शुक्रवारी वेळ दिला आहे. या रुग्णवाहिकांची गरज त्या त्या गावात असताना पालकमंत्र्यांच्या या कृतीबाबत संताप उमटला. ह्यकोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाहीह्ण अशा घोषणा देत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर ठाण मांडले.जिल्ह्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून जिल्हा परिषदेने पत्रकारांना लसीमध्ये प्राधान्यक्रम देत लसीकरण सुरू केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या दबावामुळे प्रशासनाने लसीकरण करण्यास आडकाठी सुरू केली. त्याचे पडसादही या आंदोलनात उमटले.रुग्णवाहिका आरोग्य केंद्राच्या ताब्यात देण्याची मागणीजिल्हाभरातून भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी सिंधुदुर्गनगरी येथे एकवटले व ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. तत्पूर्वी राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची भेट घेत या रुग्णवाहिका तत्काळ त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ताब्यात द्या अशी मागणीही केली. खनिकर्म विभागाच्या निधीतून या ६ रुग्णवाहिका मंजूर झाल्या असून पालकमंत्री व खनिकर्म विभागाकडून आदेश प्राप्त होताच त्या सोडण्यात येतील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.