शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

‘रायगडचा राजकैदी’मधून उमटविला ठसा

By admin | Published: December 19, 2014 9:54 PM

ऐतिहासिक नाटक : पार्सेकर दशावतारी नाट्यमंडळाची निर्मिती

वेंगुर्ले : वेंगुर्ले येथील पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाने यावर्षी निर्मिती केलेले ‘रायगडचा राजकैदी’ हे ऐतिहासिक नाटक समाजातील लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करीत आहे. वेंगुर्ले येथील पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ दरवर्षी ट्रिकसिनयुक्त नाटकांची निर्मिती करते. यावर्षी समाजातील लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी यासाठी ‘रायगडचा राजकैदी’ या नाटकाची निर्मिती करून ऐतिहासिक नाटकामध्येही आपला वेगळा ठसा उमटविला आहे. या नाटकामध्ये रथारूढ सूर्यदेव, शुक्रमुनी दर्शन, भवानी माता, वाघाशी झुंज, साखळदंडातील जेरबंद कैदी, सरकती शिवपिंडी, भगव्या पताकांचे भाले होणे, धडापासून उडविलेले शिर, स्वप्न साक्षात्कार असे एकापेक्षा एक ट्रिकसिन लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच आनंद नार्वेकर, बाबा कामत, पप्पू नांदोसकर, रामचंद्र रावले, चारुदत्त तेंडोलकर, नितीन आशियेकर, प्रशांत मयेकर, सुधीर हळदणकर, आपा चव्हाण, रामू शिंगाडे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.या नाटकाला बाबल गावकर-हार्मोनियम, राकेश रेडकर- पखवाज, हरेश नेमळेकर (तालरक्षक) यांनी संगीतसाथ दिली आहे. गौरव पार्सेकर यांची प्रकाशयोजना आहे. नाटक यशस्वी होण्यासाठी मामा दळवी, दत्ताराम गोडकर, भाऊ कुबल, समीर ताम्हणकर, आनंद दाभोलकर, बाळा पावसकर, अर्जुन परब, रवी बांदेकर यांनी सहकार्य केले आहे. मालक प्रभाकर पार्सेकरांच्या संकल्पनेतून नाटकाची निर्मिती झाली. (प्रतिनिधी)