सिंधुदुर्ग : वन्यहत्ती वन्यप्राण्यांमूळे शेतपिकांचे अथवा इतर नुकसान झाल्यास वनपरिक्षेत्र कार्यालय आंबोली येथे संपर्क साधावा. जेणे करुन नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई प्रकरणे मंजुरीसाठी तत्काळ पाठविणे सोईचे होईल. आंबोली गावातील ग्रामस्थांनी आपली स्वत:ची काळजी घ्यावी तसेच सर्तक राहण्याचे आवाहन सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक डी.पी खाडे व आंबोलीचे वनक्षेत्रपाल विद्या घोडके यांनी केले आहे.आंबोली वनपरिक्षेत्रातील आंबोली परिमंडळामधील नांगरतास, फाटकवाडी या नियतक्षेत्रामध्ये वन्यहत्ती एक टस्कर या वन्यप्राण्यांचा वावर गेले ७ ते ८ दिवस वाढलेला आहे. हा टस्कर गावातील ग्रामस्थांचे शेतातील पिक व ऊसाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानी करित आहे. गावातील व आजुबाजुच्या परिसरात वन्यप्राणी यांनी शेतपिकाचे नुकसान करु नये. यास्तव शेतात मचाण करुन त्यावर रात्री शेतपिकाचे सरंक्षण करण्यात येते.
वनविभागाचे ग्रामस्थांना आवाहन
- वन्यहत्ती या क्षेत्रात आहे तोपर्यंत रात्रीसंरक्षण कामी मचाणावर जावु नये.
- कोणत्याही व्यक्तीने हत्ती जवळ जावु नये अथवा त्यांला त्रास होईल असे कोणतेही कृत्य करु नये.
- सायंकाळ नंतर शेतात काम करणे टाळावे.
- हत्तीचा वावर ज्या क्षेत्रात आहे. तेथे रात्रीचा प्रवास करु नये.
- सायंकाळनंतर आवश्यक कामा वैतिरिक्त घराबाहेर पडू नये.
- हत्ती जवळ मोबाईल व कॅमेराव्दारे फोटो काढण्यास जावू नये.
वनकर्मचाऱ्यांकडून रात्रीची गस्त सुरूतसेच वन्यहत्तीचा वावर असलेल्या क्षेत्रात वन कर्मचारी यांच्या टिम तयार करुन वन्यहत्ती याला मानवीवस्ती पासून दूर ठेवण्यासाठी रात्रीग्रस्त करीत आहेत. शेतपिकांचे व ऊसपिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होवू नये यासाठी रात्री गस्त कर्मचाऱ्यांमार्फत वन्य हत्तीला दूर ठेवण्याचा प्रयत्न कर्मचारी यांचे मार्फत चालू आहे.