सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात शिंदे गटाला मतदारांनी जोरदार धक्का दिला असून अवघ्या दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे.त्यामुळे हा मंत्री दीपक केसरकर यांना इशाराच मानला जात आहे.ज्या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाला यश मिळविता आले ते निसटते यश मानले जात आहे.त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात भाजपच किगमेकर ठरली आहे.
सावंतवाडी तालुक्यात भाजप ने जोरदार मुसंडी मारली असून 52 पैकी 32 ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यातील बांदा ग्रामपंचायत वर भाजपने आपले वर्चस्व अबाधित ठेवले असून माजगाव तसेच केसरी ग्रामपंचायत वर भाजपने अनपेक्षित यश मिळवले आहे.पण मतदारांनी नेमळे ग्रामपंचायती त भाजप ला धक्का दिला आहे.ही ग्रामपंचायत अनेक वर्षे भाजप च्या ताब्यात होती पण यावेळी मतदारांनी अनपेक्षित कैल दिल्याने सर्वानाच धक्काच बसला आहे.या ग्रामपंचायतीत तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती तर केसरी ग्रामपंचायतीवर अनेक वर्षे मंत्री दीपक केसरकर यांचे समर्थक राघोजी सावंत यांची सत्ता होती.पण मंत्री रविंद्र चव्हाण यांचे या गावात घर असून त्याचे समर्थक संदिप गावडे यांनी या ग्रामपंचायत वर्चस्व प्रस्थापित करत मंत्री केसरकर यांना धक्का दिला आहे.
चराठे मध्ये शिवसेनेने सत्ता राखली असली तरी ओटवणे ग्रामपंचायतीवर गाव विकास पॅनेलने विजय मिळवत शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आहे.कारिवडे कुणकेरी माडखोल आंबेगाव या ग्रामपंचायत वर भाजप ने वर्चस्व राखले असले तरी जिल्हा बँक संचालक महेश सारंग याचा करिष्मा या सर्वात कमी आला आहे.तर मडुरा ग्रामपंचायत राखत संजू परब यांनी अनेक वर्षाचा आपला गड शाबूत ठेवला आहे.
या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप बरोबरच ठाकरे गटाने ही यश मिळवले असले तरी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना मतदारांनी जोरदार धक्का दिला असून अवघ्या दोन ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व राहिले आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची सेमी फायनल म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे बघितले जात असते मात्र यात केसरकरांचा करिष्मा दिसून आला नसून भाजप ने सर्वत्र वर्चस्व राखल्याने हा केसरकर यांच्यासाठी हा एकप्रकारे धक्काच मानला जातो