सावंतवाडी : केसरीसह देवसू येथे लीलीची फुलशेती गव्यांच्या कळपाने खाऊन फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या या फुलशेतीला गव्यांच्या कळपाने लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. देवसू परिसरात लीलीची फुलशेती मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे.केसरी धनगरवाडी नजीक पुरुषोत्तम सदानंद परांजपे तसेच देवसु खालचीवाडी येथील समीर दीपक शिंदे यांच्या लिलीच्या फुलशेतीचे गव्यांच्या कळपाने अतोनात नुकसान केले आहे. या भागात इतर शेतकऱ्यांची ही फुलशेती आहे. मात्र गव्यांच्या या उपद्रवांमुळे या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.फुल शेतीच्या या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी आंबोली वन विभागाच्या वनक्षेत्रपाल कल्पना घोडके आणि देवसू वन परिमंडळाचे वनपाल सदानंद परब यांचे या फुलशेतीच्या नुकसानीबाबत लक्ष वेधून नुकसान भरपाई मागणी केली. तसेच या भागातील उर्वरित फुल शेतीची नुकसानी टाळण्यासाठी या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली.
सिंधुदुर्गातील केसरीसह देवसू येथे गव्यांनी लीलीची फुलशेती केली फस्त, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 5:23 PM