सावंतवाडीत देशी गायदूध केंद्राचे उद्धाटनसामूहीक गोपालनावर भर देण्याची गरजसावंतवाडी : गाईच्या दुधाचे महत्त्व पूर्वापार आहे. मात्र, आज गोधन कमी होत आहे. त्यावर उपाय म्हणून सामुदायिक गोपालनावर भर देण्याची गरज आहे. यामुळे गोधन टिकून विविध रोगांवरील प्रतिबंधक म्हणून उपयुक्त पडणारे गाईचे दूध सहज निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक डॉ. जी. डी. जोशी यांनी केले.सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट आॅर्गनिक फार्मस फेडरेशन यांच्या सौजन्याने मँगो ग्रुपच्या ह्यगोधनम्ह्ण या देशी गायीच्या दूध केंद्राचे उद्घाटन रविवारी सायंकाळी जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत फेडरेशनचे अध्यक्ष बाळासाहेब परूळेकर, महेश कुमठेकर, राजन आंगणे, रणजित सावंत, आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. जोशी म्हणाले, भारतातील कृषी आणि ऋषी संस्कृतीचे मूळ गोधन आहे. गायीच्या दुधामुळे रोगप्रतिबंधक शक्ती वाढते. त्यामध्ये असलेले ह्यओमेगा थ्रीह्ण हे द्रव्य पौष्टिक असून गायीच्या तुपही गरोदरमहिलांना हे आरोग्यदायी आहे. मात्र, अनेक रोगांवर महत्त्वपूर्ण असणारे गायीचे दूध सहज उपलब्ध होणे आज दुरापास्त झाले आहे. ते सहज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उद्योजक महेश कुमठेकर यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. मँगो ग्रुपचे गोधनम् हे देशी गायीचे शुध्द दूध सावंतवाडीत आता उपलब्ध होणार आहे. ही आनंदाची बाब असल्याचे जोशी म्हणाले. देशी गायीच्या दुधात रोगप्रतिबंधक शक्ती असल्याने त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी आज देशी गायीवर परदेशात संशोधन सुरू आहे. हिरव्यागार कोकण हा सेंद्रीय खताचा मोठा कारखाना होण्यासाठी सामूहिक गोपालनावर भर दिल्यास गोधन वाढण्यास मदत होईल, असे डॉ. जोशी यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब परूळेकर म्हणाले, देशी गाय परिसरातील वातावरण प्रसन्न करते. त्यामुळे ह्यज्याच्या दारी गाय त्याच्या दारी विठ्ठलाचे पाय,ह्ण अशी समज आहे. पाश्चात्य देशातील गायीचे दूध हे आरोग्यदायी नसते. देशी गायीचे दूध औषधाची खाण आहे. त्यामुळे देशी गायीचे संवर्धन केल्यास निसर्ग वाचू शकतो. यासाठी कुमठेकर यांनी घेतलेला पुढाकार दिशादर्शक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फेडरेशनचे रणजित सावंत यांनी केले. या कार्यक्रमाला सावंतवाडीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)मँगो ग्रुपच्या गोधनम् या देशी गायीच्या दूध केंद्राचे उद्घाटन डॉ. जी. डी. जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी महेश कुमठेकर, बाळासाहेब परूळेकर, अभिमन्यू लोंढे आदी उपस्थित होते. (रूपेश हिराप)