शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

निवजे येथे सिंधुदुर्गातील पहिल्या भात खरेदी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 8:57 PM

गेल्या दहा वर्षांत प्रथमच एवढ्या लवकर नोव्हेंबर महिन्यात भात खरेदीचा शुभारंभ होत आहे. चांदा ते बांदा योजना व कृषी यांत्रिकीकरण योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला असून शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाद्वारे श्री पद्धतीने मोठ्या प्रमाणात भात लागवड केली. त्यामुळे भाताचे उत्पादन वाढले आहे. भात खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.

ठळक मुद्देनिवजे येथे सिंधुदुर्गातील पहिल्या भात खरेदी केंद्राचा शुभारंभ यावर्षी ६० हजार क्विंटल भात खरेदीचा संकल्प  : वैभव नाईक

कुडाळ : गेल्या दहा वर्षांत प्रथमच एवढ्या लवकर नोव्हेंबर महिन्यात भात खरेदीचा शुभारंभ होत आहे. चांदा ते बांदा योजना व कृषी यांत्रिकीकरण योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला असून शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाद्वारे श्री पद्धतीने मोठ्या प्रमाणात भात लागवड केली. त्यामुळे भाताचे उत्पादन वाढले आहे. भात खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीच्या नुकसानीची रक्कम राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा होईल. तसेच कृषीविषयक इतर योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यात येईल. त्याचप्रमाणे यावर्षी उच्चांकी भात खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गतवर्षी शासनामार्फत ३६ हजार क्विंटल भात खरेदी करण्यात आली. मात्र, यावर्षी ६०हजार क्विंटल भात खरेदी करण्याचा संकल्प आहे, असेही आमदार नाईक यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई यांच्यावतीने बजाज सिंधुदुर्ग राईस मिल अंतर्गत कुडाळ तालुक्यातील निवजे येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी नामदेव गवळी, जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, कुडाळ पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव, सदस्या श्रेया परब, उपतालुकाप्रमुख बाळू पालव, बजाज राईस मिलचे मॅनेजर संदीप चव्हाण, कृषी पर्यवेक्षक निलेश उगवेकर, प्रभाकर वारंग, निवजे सोसायटीचे चेअरमन सूर्यकांत सावंत, शाखाप्रमुख संतोष पिंगुळकर, शेतकरी महादेव पालव, दत्ता सावंत, सीताराम पालव, श्याम पिंगुळकर सुधीर राऊळ आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्यातील निवजे या ग्रामीण भागातील सोसायटीमध्ये प्रथम भात खरेदीचा शुभारंभ केला त्याबद्दल नागेंद्र परब यांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.हमीभावात वाढ केलीभात खरेदीसाठी जिल्ह्यात ४२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. गतवर्षी शेतकऱ्यांना क्विंटलमागे १८१५ रुपये हमीभाव देण्यात आला होता. तसेच त्यावर ७०० रुपये बोनस मिळून २५१५ रुपये दर देण्यात आला होता. यावर्षी शासनाने हमीभावात ५३ रुपयांची वाढ केली असून १८६८ रुहमीभाव लागू करण्यात आला आहे, असे आमदार नाईक म्हणाले. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग