सिंधुदुर्गनगरी दि. २८ :राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना(NMMSS) व माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून ३ हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता (NSIGSE) योजना सन २0१७-१८ साठी www.scholarships.gov.in (National Scholarship Portal) हे केंद्र शासनाचे संकेतस्थळ कार्यान्वित झाले असल्याने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज आॅनलाईन पध्दतीने दिनांक ३0 सप्टेंबर २0१७ पर्यंत भरावयाचे आहेत.
माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून ३ हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता पात्रतेचे निकष (NSIGSE) - शासकीय / शासन अनुदानित / स्थानिक स्वराज्य संस्थेतील इ.९ वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचति जाती- जमातीमधील वय वर्षे १६ पूर्ण न झालेल्या अविवाहित (दिनांक ३१ मार्च रोजीचे वय) मुलींसाठीच ही योजना लागू आहे. ज्या मुली कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातून इ. ८ वी उत्तीर्ण झालेल्या आहेत. अशा सर्व मुलीसाठी ही योजना लागू आहे. खासगी विनाअनुदानित शाळांमधील विद्याथीर्नीसाठी तसेच केंद्र शासनाकडून चालविल्या जाणा-या शाळासाठी ही योजना लागू नाही. या योजनेअंतर्गत पात्र विद्याथ्यीर्नी इयत्ता १0 वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर व वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनामार्फत विद्याथीर्नींच्या बँक खात्यावर प्रोत्साहन भत्याची रक्कम जमा करण्यात येते.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMSS) - राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही केंद्र शासन पुरस्कृत योजना असून महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी / विद्यार्थ्यींनी या परीक्षेसाठी पात्र असतात. कुटुंबाचे वार्षिक एकत्रित उत्पन्न (आई-वडीलांचे) १ एक लाख ५0 हजार रुपये पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांचेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना इ. ९ वी ते १२ वी पर्यत अशी एकूण ४ वर्षे दरमहा ५00 रुपये प्रमाणे वषार्ला एकूण ६ हजार रुपये शिष्यवृत्ती केंद्रशासनामार्फत पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे नमुद केल्याप्रमाणे नवीन (इ. ९ वी) व नुतनीकरणाच्या (इ. १0 वी, ११ वी, व १२ वी) विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर आॅनलाईन माहिती भरणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक २0 नोव्हेंबर २0१६ इयत्ता ९ वी तील विद्यार्थी, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक ७ जानेवारी २0१६ इयत्ता १0 वी तील नुतनीकरणाचे विद्यार्थी, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक १0 जानेवारी २0१५ इयत्ता ११ वी तील नुतनीकरणाचे विद्यार्थी , राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक १७ नोव्हेंबर २0१३ इयत्ता १२ वी तील नुतनीकरणाचे विद्यार्थी. या दोन्ही योजनांच्या पात्र विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती www.scholarships.gov.in या वेबसाईटवर लॉगीन आयडी तयार करुन दिनांक ३0 सप्टेंबर २0१७ पर्यंत आॅनलाईन भरावयाची आहे. पात्र विद्यार्थी किंवा त्यांचे पालक यांनी माहिती आॅनलाईन पध्दतीने भरण्यासाठी अधिक माहितीसाठी शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परीषद यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या (माध्यमिक) शिक्षणाधिकाºयांनी केले आहे.