शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

त्या २६ गावांमध्ये कोरोना तपासणी चाचण्या वाढवा : वैशाली राजमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 2:29 PM

CoronaVirus Kankavli : कणकवली तालुक्यात चार हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर २६ गावांतील काही वाड्या कोरोना हॉटस्पॉट ठरल्‍या आहेत. या वाड्यातील प्रत्‍येक नागरिकाची कोरोना तपासणी होण्याच्या दृष्‍टीने चाचण्या वाढवा, असे निर्देश प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देत्या २६ गावांमध्ये कोरोना तपासणी चाचण्या वाढवा : वैशाली राजमाने कणकवली तालुकास्तरीय टास्क फोर्सची बैठक

कणकवली : कणकवली तालुक्यात चार हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर २६ गावांतील काही वाड्या कोरोना हॉटस्पॉट ठरल्‍या आहेत. या वाड्यातील प्रत्‍येक नागरिकाची कोरोना तपासणी होण्याच्या दृष्‍टीने चाचण्या वाढवा, असे निर्देश प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.कणकवली तालुकास्तरीय टास्क फोर्सची बैठक तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. यावेळी तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. एम. शिकलगार, नगरपंचायतचे प्रतिनिधी व इतर कर्मचारी उपस्थित होते. तालुक्‍यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सद्य:स्थितीत हॉटस्पॉट ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.त्यामुळे तेथील लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपले कुटुंब, आपली वाडी, गाव कोरोनामुक्त करण्यास प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वैशाली राजमाने यांनी केले. तालुक्यात कलमठ, लिंगेश्वर, ओसरगाव, नांदगाव, खारेपाटण दक्षिण बाजार, जानवली, खारेपाटण संभाजीनगर, तोंडवली, तळेरे फोंडाघाट, वागदे, कसवण, तरंदळे, ओझरम्, डामरे, वरवडे, चिंचवली, फोंडा, पियाळी, दारूम, कासरल, कासार्डे, करूळ, फोंडा उत्तर बाजार, घोणसरी आदी २६ गावे अथवा वाड्यांमध्ये मिळून ३८४१ सक्रिय रुग्ण सोमवारपर्यंत आढळून आले आहेत.शहरांमध्ये कणकवली बाजारपेठ, शिवाजीनगर, विद्यानगर टेंबवाडी , परबवाडी, जळकेवाडी, मधलीवाडी या ठिकाणी मिळून ९९ सक्रिय रुग्ण होते. या प्रत्येक भागात दहा किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण असल्याने हा भाग किंवासंबंधित गावांमधील वाडी हॉटस्पॉटमध्ये येते.बंधने पाळली तर हॉटस्पॉट कमी होतीलदहापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेल्या ठिकाणी गावांमध्ये किंवा वाड्यांमध्ये चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाला तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या असून या वाड्या-वस्त्यांमधील लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. या भागातील ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. प्रत्येकाने सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर करणे या त्रिसूत्रीचा अंगीकार करावा.येथील लोकांनी अत्यावश्यक काम वगळता ही साखळी तोडण्यासाठी काही दिवस घरी थांबणे, इतरांमध्ये न मिसळणे अत्यावश्यक आहे. याबाबतची बंधने काही दिवसांसाठी पाळली तर तालुक्यातील हॉटस्पॉट कमी होतील. त्यासाठीचे सर्व प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत, असेही वैशाली राजमाने यावेळी म्हणाल्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKankavliकणकवलीTahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्ग