वैभव साळकरदोडामार्ग : तिलारी धरणक्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असल्याने नागरिकांनी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सतर्कतेचा उपाय म्हणून नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी.जाधव यांनी केले आहे.याबाबत काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही तासात धरण क्षेत्राच्या परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा व तिलारी धरणातिल पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी मुख्य धरणाच्या पाण्याचा खळग्यातील धरणातून तर उन्नेयी बंधाऱ्याच्या थेट नदीपात्रात १५ जुलै पासून विसर्ग सुरू आहे. त्यात आज गुरुवारपासून वाढ करण्यात आली आहे.सध्या नदी इशारा पातळीच्या ०.९५ मी.खाली असून येत्या एक - दोन दिवसात जर अशीच अतिवृष्टी होत राहिली तर हा विसर्ग आणखी वाढविला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता जाधव यांनी केले आहे.
Sindhudurg: तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 6:43 PM