शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

लम्पी आजाराचा जनावरांना वाढला धोका, पशुपालकांनो काळजी घ्या

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 14, 2022 12:06 PM

हा आजार साधारणपणे दोन तीन आठवड्याांत बरा होवू शकतो.

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जनावरांमध्ये लम्पी स्कीन डिसिजचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. पशुपालकांनी मुळीच घाबरून न जाता लम्पी स्कीन रोगाने सकारात्मक निदान करण्याकरीता पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून आजारी जनावरांवर औषधोपचरा करून घ्यावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राने केले आहे.लम्पी स्कीन रोग हा त्वचा रोग असून तो विषाणूजन्य व साथीचा आजार आहे. हा रोग प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना अर्थात गाई, बैल, वासरे यांच्यात आढळून येतो. हा आजार माणसांना होत नाही. हा विषाणू मेढ्यांमध्ये होणार्या देवीच्या विषाणूशी साधर्म्य असणारा असून सर्वसाधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. हा आजार साधारणपणे दोन तीन आठवड्याांत बरा होवू शकतो.

लम्पी त्वचा रोग म्हणजे काय ?

  • लम्पी त्वचारोग हा विषाणूपासून होणार संसर्गजन्य रोग आहे. पॉक्सीविरिडे जातीमधील कॅप्रिपॉक्स विषाणूमुळे रोग होतो.
  • या रोगाचा प्रसार डास, गोमाशी आणि गोचिड यांच्याव्दारे होतो. तसेच बाधित जनावरांच्या संपर्कात निरोगी जनावरे आल्यामुळेदेखील होतो.

काय आहेत लक्षणे

  • दोन ते तीन दिवसांसाठी मध्यम तिव्रतेचा ताप आणि त्यानंतर शरीरावीर सर्वत्र कडक घट्ट गोलाकार फोडी येतात. या फोडीच्या कडा घट्ट आणि दर आलेल्या दिसतात.
  • यामध्ये वरची त्वचा आतील कातडे आणि स्नायूंचा भागदेखील चिकटलेला आढळतो. काही कालावधीनंतर हे फोड काळे पडतात व त्यावर खपली तयार होते.
  • ही खपली निधून गेली तर एक रूपयांच्या नाण्याप्रमाणे गोल खड्डा होतो आणि आत गुलाबी किवा लाल रंगाची त्वचा दिसू लागते.
  • याशिवाय जनावरांचे वजन कमी होणे, अशक्तपणा येणे, चारा न खाणे, लसिका ग्रंथींमध्ये सूज येणे, पायाला सूज येणे, पोळाला सूज येणे, दूध उत्पादनात कमी होणे, गाभडणे, जनावरांमध्ये वंध्यत्व येणे आणि थोड्या प्रमाणात मरतूक होणे, अशी लक्षणे आढळून येतात.

नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय

  • लक्षणे दिसताच जनावरांना इतर निरोगी जनावरांमध्ये मिसळू देवू नये. आजारी जनावरे सार्वजनिक कुरणामध्ये चरण्यासाठी घेऊन जावू नये किवा जे रोगी जनावरे आहेत त्यांना आजारी जनावरांपासून तातडीने वेगळे करावे. आजारी जनावरांच्याजवळ खाद्य पाणी करू नये.
  • गोठ्यामध्ये व निरोगी जनावरांवरती कीटकनाशके फवारणी करणे, लक्षणे आढळलेल्या गावांमधून इतर जनारांची वाहतूक, बाजार आणि इतर दळणवळण बंद करावे. आजारामुळे दगावलेल्या जनावरांना खोल खड्डा करून पुरून घ्यावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग