आम्ही खाकिंव्हमधील मेसच्या 'बंकर'मध्ये सुरक्षित, सावंतवाडीतील विद्यार्थ्याने कथन केली भयानता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 05:03 PM2022-02-26T17:03:23+5:302022-02-26T17:15:59+5:30

शहरात सर्वत्र बाॅम्बचे आवाज ऐकू येत असून धुराचे लोटच्या लोट पसरले आहेत

Indian students in Kiev sheltered in bunker, student from Sawantwadi told of the dire situation there | आम्ही खाकिंव्हमधील मेसच्या 'बंकर'मध्ये सुरक्षित, सावंतवाडीतील विद्यार्थ्याने कथन केली भयानता

आम्ही खाकिंव्हमधील मेसच्या 'बंकर'मध्ये सुरक्षित, सावंतवाडीतील विद्यार्थ्याने कथन केली भयानता

Next

अनंत जाधव

सावंतवाडी : युक्रेन वर रशियाने केलेल्या हल्याची झळ आता भारतातून युक्रेन मध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना बसू लागली आहे. यात सावंतवाडीतील तीन विद्यार्थ्याचा समावेश आहे. त्यातील नेत्रन जायबा धुरी या विद्यार्थ्यांशी 'लोकमत'ने संपर्क साधून तेथील परिस्थिती जाणून घेतली. नेत्रन प्रमाणेच सोमेश टक्केकर व शुभम घावरे हे दोघे वेगवेगळ्या शहरात अडकून पडले असून ते सुरक्षित आहेत.

यावेळी नेत्रन तेथील परिस्थिती भयावह असल्याचे सांगितले. शहरात सर्वत्र बाॅम्ब चे आवाज ऐकू येत असून धुराचे लोटच लोट दिसत आहेत. मात्र आम्ही सुरक्षित असून हाॅस्टेलच्या शेजारी एक मेस असून त्याच्या तळघरात आम्ही आसरा घेतल्याचे त्यांने सांगितले. सध्यातरी माॅल तसेच एटीएम सेवा सुरू असून ये जा करण्यास पोलीस मदत करत असल्याचे म्हणाला.

सावंतवाडी येथील नेत्रन जायबा धुरी हा किव्ह झू वेटनरी विद्यापीठात पशुवैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. तो 8 डिसेंबरला सावंतवाडीतून  युक्रेनला गेला होता. महाविद्यालयीन प्रवेशाबाबत काम झाल्यानंतर तो पुन्हा भारतात येणार होता. पण तत्पूर्वीच रशियाने युक्रेन वर हल्ला केला आणि सर्व जाण्या येण्याचे मार्गच बंद झाले. अन् नेत्रन तेथेच अडकून पडला.

सततचे बाॅम्ब हल्ले आणि त्यातून मोठमोठे आवाज आणि जिकडे तिकडे धुराचे लोट यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. आमच्यातील अनेक विद्यार्थी हे हाॅस्टेल च्या शेजारी केरळ येथील एकाची मेस आहे त्यानी तळघर केले असून त्याचा आम्ही आधार घेतला असून सुरक्षित असल्याचे नेत्रन म्हणाला. पण भारत सरकारने लवकरात लवकर आम्हाला येथून घेऊन जाण्याबाबत निर्णय घ्यावा असेही तो म्हणाला.

Web Title: Indian students in Kiev sheltered in bunker, student from Sawantwadi told of the dire situation there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.