कनेडी (सिंधुदुर्ग) : कनेडी परिसरातील काजूच्या बागांमधील काजूच्या झाडांना रोगाची लागण झाल्याने त्यांची पाने लाल होऊन गळून जात आहेत. त्यामुळे रोपेही मरत आहेत. कृषी विभागाने तत्काळ रोपांची पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.सह्याद्रीच्या पट्ट्यातील नाटळ, दिगवळे, दारिस्ते, कुंभवडे, नरडवे, भिरवंडे, सांगवे, हरकुळ या गावांतील काजू रोपांना रोगाची लागण झाल्यामुळे पाने गळून जाऊन ती मरत आहेत. मोठ्या कष्टाने लावलेली झाडे डोळ्यादेखत नष्ट होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.अति पावसामुळे रोपांच्या मुळावरती जास्त प्रमाणात पाणी साचल्याने रोपांची मरगळ वाढते. सध्या काजू रोपांची पानेही लालसर व पिवळी होत आहेत. तसेच ती जास्त पिवळसर होऊन गळत आहेत. त्यातील काही रोपे ही मरत असून भविष्यात अजून मोठ्या प्रमाणात या रोगाची लागण होऊ नये यासाठी कृषी विभागाने त्याची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे .
काजूच्या झाडांना रोगाची लागण, पानांची गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 7:28 PM
कनेडी परिसरातील काजूच्या बागांमधील काजूच्या झाडांना रोगाची लागण झाल्याने त्यांची पाने लाल होऊन गळून जात आहेत. त्यामुळे रोपेही मरत आहेत. कृषी विभागाने तत्काळ रोपांची पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
ठळक मुद्देकाजूच्या झाडांना रोगाची लागण, पानांची गळती कनेडी परिसरात तत्काळ कृषी विभागाने पाहणी करण्याची शेतकऱ्यांची मागणी