शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

सिंधुदुर्गसह कोल्हापुरात ९ रानटी हत्तींचे वास्तव्य, उपवनसंरक्षक चव्हाण यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 1:08 PM

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात सध्या रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला असला तरी जिल्ह्यात हत्ती हटाव मोहिमेचे नियोजन नाही. तसेच सिंधुदुर्गसह कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ९ रानटी हत्ती वास्तव्यास आहेत. यात दोन पिल्ले आहेत. कर्नाटक येथील हत्ती पूर्ण प्रशिक्षित झाला असून त्याच्यासह अन्य दोन अशा एकूण तीन हत्तींना ताडोबा अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे सिंधुदुर्गसह कोल्हापुरात ९ रानटी हत्तींचे वास्तव्य, उपवनसंरक्षक चव्हाण यांची माहिती : रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला असला तरी हत्ती हटाव मोहीम नाही

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सध्या रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला असला तरी जिल्ह्यात हत्ती हटाव मोहिमेचे नियोजन नाही. तसेच सिंधुदुर्गसह कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ९ रानटी हत्ती वास्तव्यास आहेत. यात दोन पिल्ले आहेत. कर्नाटक येथील हत्ती पूर्ण प्रशिक्षित झाला असून त्याच्यासह अन्य दोन अशा एकूण तीन हत्तींना ताडोबा अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी दालनात लोकशाही दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. टी. जगताप उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांना जिल्ह्यात रानटी हत्तींनी घातलेल्या धुमाकुळाबाबत विचारत त्यांच्या बंदोबस्तासाठी कोणते नियोजन करण्यात आले आहे का ? असा प्रश्न केला असता त्यांनी हत्ती हटाव मोहिमेचे नियोजन नसल्याचे सांगितले.

यावेळी त्यांनी अलीकडे या हत्तींचा उपद्रव वाढला आहे. नुकसानी मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून सुरु असल्याचे मान्य केले. बंदोबस्तासाठी कोणते नियोजन नसले तरी नुकसानी वाटप आम्ही ३० दिवसांत करीत आहोत, एवढाच दिलासा नुकसानग्रस्तांना सध्यातरी आम्ही देत आहोत. आतापर्यंत १८३६ बाधित कुटुंबाना एक कोटी ४ लाख रुपये रक्कम वाटप करण्यात आली आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.यापूर्वी चारवेळा हत्ती हटाव मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी तीन हत्ती पकडण्यात आले. त्यातील दोन हत्ती मृत झाले. एक हत्ती कर्नाटक येथे प्रशिक्षण घेत आहे. यासाठी वर्षाला जिल्हा प्रशासन १० लाख रुपये खर्च करीत आहे. यात माउताचे मानधन व इतर खर्च आहे.

कर्नाटक येथील हत्ती पूर्ण प्रशिक्षित झाला असून त्याच्यासह अन्य दोन अशा एकूण तीन हत्तींना ताडोबा अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याचे यावेळी चव्हाण यांनी सांगितले.तसेच नरेंद्र डोंगरावर रानटी जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. त्याठिकाणी कॅमेरा बसविण्यात आला होता. त्या कॅमेऱ्यात १५ गवे असल्याचे कैद झाले असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.हत्ती बदला घेतोहत्तींनी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे अशांना ३0 दिवसांच्या आत सेवा हमी कायद्यांतर्गत एनईएफटीच्या माध्यमातून पैसे खात्यात जमा केले जातात. हत्तींची धरपकड करणाऱ्या व्यक्तीला हत्ती बरोबर ओळखून त्याच्या बागेचे नुकसान करतो, असे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी सांगत दोडामार्ग येथील एका बागायतदार शेतकऱ्याचे उदाहरण दिले. या शेतकऱ्याने हत्तीला धरपकड करत जंगलात हुसकावून लावले होते. त्यानंतर या हत्तीने त्या शेतकऱ्यांच्या बागेची नासधूस केली. मात्र बाजूला अन्य शेतकऱ्यांच्या बागा होत्या त्याला साधे स्पर्शही केले नाही.दोन पिल्लांचा जन्म झालासिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी सात हत्तींचा वावर होता. मात्र सप्टेंबर व नोव्हेंबर २0१८ या दरम्यान दोन पिल्लांचा जन्म झाला. त्यानंतर ही संख्या ९ वर गेली. आता सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यात ९ हत्ती आहेत. या दोन जिल्ह्यात हत्ती ये-जा करत असतात. 

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग