शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु

By admin | Published: March 03, 2015 9:24 PM

तंटामुक्त समिती : गावात राजकारण न आणण्यावर एकमत

मेहरून नाकाडे -रत्नागिरी  ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राजकारण न करता बिनविरोध निवडणुका लढवण्यासाठी कळझोंडी गावातील तंटामुक्त समितीची धडपड सुरू झाली आहे. तंटामुक्त समितीच्या प्रयत्नाला यश येत असून, तीन वॉर्ड पैकी दोन वॉर्डमध्ये बिनविरोध निवडणुका होण्यासाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. तर एका वॉर्डमध्ये बोलणी सुरू असून, संबंधित वॉर्डमध्येही यश येण्याची शक्यता आहे.बारा वाड्यांतंर्गत १७७५ लोकवस्तीचे कळझोंडी गाव रत्नागिरी पासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. २३ फेब्रुवारी १९५७ साली ग्रामपंचायतीची स्थापना झाली तेव्हापासून ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध होत होत्या. गावपॅनलचे त्यावर वर्चस्व होते. मात्र २००५ साली निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर २०११मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. दोन टर्म निवडणुका घेण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा गावात कोणतेही राजकारण न करता विकासकामासाठी इच्छूक उमेदवारांना संधी देण्यासाठी बहुमतांने निवडून आणण्याचे ठरवण्यात आले आहे. परजासत्ताक दिनादिवशी झालेल्या तंटामुक्त समितीच्या बैठकीत ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुकीचा विषय मांडण्यात आला होता. दि. ४ फेब्रुवारीच्या बैठकीत ठराव मांडण्यात आला होता.निवडणुका बिनविरोध करण्याची कारणे मांडण्यात आली आहेत. शिवाय ज्यांना निवडणुका हव्या आहेत, त्यांचेकडून बिनविरोधासाठीची कारणे मागवण्यात आले आहेत. परंतु, तंटामुक्त समिती निर्विवादपणे बिनविरोध निवडणुका होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ग्रामस्थांचेही सहकार्य लाभत आहे. त्यामुळे गावात तंटा नावालाही उरलेला नाही. उलट या मोहिमेला ग्रामस्थांचाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे.प्लास्टिक निर्मूलन राबवत असताना गावात कापडी पिशव्यांचे वाटप नागरिकांना करण्यात आले आहे. गेल्या २५ वर्षांपासून गावात दारूबंदी करण्यात आली आहे. ग्रामसुरक्षा दल कार्यरत असून गावात शांतता, सुव्यवस्था नांदत आहे. २००७ पासून तंटामुक्त अभियानामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग असून, २०१२-१३ मध्ये गावाला तंटामुक्त पुरस्कारदेखील प्राप्त झाला आहे. पुरस्काराच्या रक्कमेचा विनियोग सामाजिक, विकासात्मक कार्यक्रम तंटामुक्त अध्यादेशाप्रमाणे करण्यात आला आहे.- व्ही. एन. जाधव,ग्रामसेवक, ग्रामपंचायत कळझोंडी.समाजसेवेस इच्छूक असणाऱ्यांना संधीजिल्हा परिषद, पंचायत समित्या असो वा विधानसभा, लोकसभा निवडणूका. यावेळी असणारे राजकारण ठीक आहे. परंतु गावाच्या विकासात कोणतेही राजकारण न आणण्याचे ठरविण्यात आले आहे. समाजसेवेसाठी मनापासून इच्छूक असणाऱ्यांना यावेळी संधी देण्यात येणार आहे. मी यावर्षी स्वत: इच्छूक नसून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे ठरवण्यात आले आहे. निवडणुकांशिवाय बहुमताने गावपॅनेलची सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला नक्कीच यश येईल.- रवींद्र वीर,सरपंच, ग्रामपंचायत कळझोंडीबिनविरोधसाठी शंभर टक्के प्रयत्नगावामध्ये तीन वॉर्डसाठी प्रत्येकी दोन जागेवर उमेदवार उभे करण्यात येतात. दोन वॉर्डमध्ये बिनविरोध निवडणूकांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. उर्वरित एका वॉर्डमध्ये चर्चा सुरू असून तेथील बहुमत लवकरच जाहीर करण्यात येईल. गाव विकासाठी, कोणतेही राजकारण न आणता, तसेच गावातील वातावरण गढूळ न करता, शिवाय पैशांचा अपव्यय होऊ नये, यासाठी बिनविरोध निवडणुकीसाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.- दीपक शिंदे,अध्यक्ष, तंटामुक्त समिती.