शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

अंगणवाडी आहार पुरवठादाराची चौकशी करा : दुर्वा खानविलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 3:59 PM

शासनाकडून अंगणवाडीतील बालकांसाठी दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, असा आरोप करीत पुरवठादाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती दुर्वा खानविलकर यांनी मासिक सभेत केली.

ठळक मुद्देअंगणवाडी आहार पुरवठादाराची चौकशी करा : दुर्वा खानविलकरनिकृष्ट पोषण आहार पुरविल्याचा  आरोप; पंचायत समितीची झूम सभा यशस्वी

वैभववाडी : शासनाकडून अंगणवाडीतील बालकांसाठी दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, असा आरोप करीत पुरवठादाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती दुर्वा खानविलकर यांनी मासिक सभेत केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीची सभा झूम अ‍ॅपवर झाली. या सभेला सभापती अक्षता डाफळे, उपसभापती दुर्वा खानविलकर, पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, लक्ष्मण रावराणे, हर्षदा हरयाण, गटविकास अधिकारी विद्या गमरे, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांची आॅनलाईन उपस्थिती होती.तालुक्यातील अंगणवाड्यांमार्फत लहान बालकांच्या पोषणासाठी आहार दिला जातो. यामध्ये विविध प्रकारची कडधान्ये, तेल आदींसह विविध वस्तूंचे कीट असते. परंतु सध्या दिला गेलेला आहार हा निकृष्ट आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून पुरवठादारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खानविलकर यांनी केली. यावेळी महिला बालविकास विभागाच्यावतीने चौकशी करण्यात येईल, असे सांगण्यात आले.कोरोनाच्या काळातील वीज बिले वाढीव आली आहेत. या बिलांमध्ये ग्राहकांना काही सवलत मिळणार आहे का? असा सवाल करीत वीज बिले भरायची की नाहीत? अशी विचारणा सदस्य रावराणे यांनी केली. त्यावेळी उपअभियंता जयकुमार कथले यांनी शासनाकडून यासंदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारच्या सूचना प्राप्त नसल्याचे सांगितले.तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. यापैकी अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीचा विमा आहे. त्यांना भरपाई मिळणे आवश्यक आहे. कृषी विभागाने कोणती कार्यवाही केली? असे रावराणे यांची विचारले असता तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे स्पष्ट केले.ओरोस येथून अहवाल येण्यास विलंबकोविड सेंटर आणि विलगीकरण कक्षामध्ये नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दोन्ही ठिकाणी अस्वच्छता आहे. वेळोवेळी सांगूनही त्यामध्ये कोणतीच सुधारणा झालेली नाही. याशिवाय तालुक्यातील कोरोना अहवाल उशिरा येत असल्याचा मुद्दा रावराणे यांनी उपस्थित केला. त्यावर ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. नवनाथ कांबळे यांनी कोविड सेंटरमध्ये दररोज स्वच्छता केली जाते. कोरोना तपासणीसाठी घेतलेले स्वॅब इथून वेळेत ओरोसला जातात; परंतु तेथूनच अहवाल येण्यास विलंब होतो. ओरोस लॅबमध्ये रुग्ण आढळल्याने हा प्रकार घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ग्रामसेवकाला नोटीस द्यावी : रावराणेतालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ७० असून सक्रिय रुग्णांची संख्या ३९ आहे. ३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी सभेत दिली. तिरवडेतर्फ सौंदळ सरपंचांना विलगीकरणावरून झालेल्या त्रासाला ग्रामसेवक जबाबदार आहेत. त्या ग्रामसेवकाला नोटीस द्यावी, अशी मागणी रावराणे यांनी केली.कुसूर येथील अतिक्रमण हटवाकुसूर बाजारवाडी येथून मुख्य रस्त्यापासून ग्रामपंचायतीकडे जाणारा मार्ग जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. मात्र, त्या मार्गावर अतिक्रमण करण्यात आले असल्याने रहदारीस बंद झाला आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी अरविंद रावराणे यांनी सभेत केली.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीvaibhavwadiवैभववाडीsindhudurgसिंधुदुर्ग