वेंगुर्ला : सिंधुदुर्गजिल्हा परिषदेच्या बांधकाम विकास योजनेंतर्गत सार्वजनिक आरोग्य विकासाखाली आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रात पार्किंग शेड व कमान बांधणे अशा सुमारे ६ लाख तसेच वैद्यकीय अधिकारी वर्ग २ व चालक निवासस्थान दुरुस्ती करणे सुमारे ९ लाख अशी एकूण १५ लाखांची तीन कामे निकृष्ट झाल्याबाबत उपसरपंच संतोष कासले यांच्या तक्रारीवरून सिंधुदुर्गजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक सदस्यीय चौकशी समिती नेमली.या चौकशी समितीचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता रमेश मठकर यांनी आडेली येथील कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. याबाबतचा गोपनीय अहवाल सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात येणार आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुतिकागृह इमारतीतून पावसाळ्यात पावसाचे पाणी येत असल्याने नवजात बालके व त्यांची आई यांना नाहक त्रास होत होता. जे निकृष्ट काम झाले त्याचे परिणाम पावसाळ्यात दिसले. त्यामुळे या कामाची नि:पक्षपाती चौकशी व्हावी अशी मागणी महिला ग्रामपंचायत सदस्यांनी केली. तर आडेली रुग्ण कल्याण समिती सदस्य नितीन मांजरेकर यांनी या कामाची तपासणी नि:पक्षपातीपणे व्हावी व या कामाचे १५ लाखांचे बिल कामाची तपासणी न करता अदा केले. त्यामुळे पालकमंत्री यांच्याकडून या कामाच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले.यावेळी बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रितम पवार, ग्रामसेवक सावंत, आडेली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रकाश गडेकर, माजी सरपंच भारत धर्णे, प्रवीण गडेकर, घन:श्याम नाईक, उपसरपंच संतोष कासले, प्रशांत मुंडये, उमेश केळुसकर, तंटामुक्त अध्यक्ष गंगाधर गोवेकर, प्राजक्ता मुंडये, सुप्रिया होडावडेकर, पल्लवी धुरी, ज्ञानेश्वरी डिचोलकर, नितीन मांजरेकर आदी उपस्थित होते.
निकृष्ट कामांची चौकशी समितीकडून पाहणी, एक सदस्यीय समिती नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 1:20 PM
zp, sindhudurngews सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विकास योजनेंतर्गत सार्वजनिक आरोग्य विकासाखाली आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रात पार्किंग शेड व कमान बांधणे अशा सुमारे ६ लाख तसेच वैद्यकीय अधिकारी वर्ग २ व चालक निवासस्थान दुरुस्ती करणे सुमारे ९ लाख अशी एकूण १५ लाखांची तीन कामे निकृष्ट झाल्याबाबत उपसरपंच संतोष कासले यांच्या तक्रारीवरून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक सदस्यीय चौकशी समिती नेमली.
ठळक मुद्देनिकृष्ट कामांची चौकशी समितीकडून पाहणी, एक सदस्यीय समिती नियुक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार