कणकवली : कणकवली तालुक्यात अंतर्गत राज्यमार्ग तसेच अनेक गावामध्ये जाणारे जोड रस्ते आहेत . त्याठिकाणी नागरिकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी , महामार्ग ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्या.तसेच कणकवली तालुक्यात ज्या ठिकाणी रस्ते आहेत त्या ठिकाणी नागरिकांना काय अडचणी येत आहेत ? याची आपण पाहणी करावी . अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी कणकवली तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे सोमवारी केली. दरम्यान , बोर्डवे येथील ग्रामस्थांनी आपल्या अडचणी तहसीलदारांना समोर मांडल्या. तसेच निवेदनही दिले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, संदेश सावंत- पटेल, विभाग प्रमुख रुपेश आमडोस्कर,मोहन येंडे, सखाराम येंडे, अहमद शेख, विवेक एकावडे, सतिष येंडे, नरेश येंडे, महादेव राठवड, शरद साळवी,नागेश चव्हाण, दिवा परब, बाबू राणे,दादा सावंत,नंदादीप तेली,दिलदार शेख आदी बोर्डवे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी तहसीलदार यांनी आपण पाहणी करतो. लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करुया. असे सांगितले.यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये म्हटले आहे की, बोर्डवेमध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या ठिकाणी महामार्गावर क्रॉस सिग्नल व गतिरोधक करण्यात यावे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सद्या चालू आहे . बोर्डवे , आंब्रड , कळसुली इत्यादी गावांकडे जाण्यासाठी ओसरगाव या ठिकाणी महामार्गावरून फाटा आहे. नवीन महामार्ग चौपदरीकरणामध्ये संबधित ठिकाणी जाण्या - येण्यासाठी कोणतीही सोय केलेली नाही .त्यामुळे त्याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे त्याठिकाणी दोन्ही बाजूनी गतिरोधक व क्रॉस सिग्नल आवश्यक आहे.तसेच ठेकेदार कंपनीकडून ओसरगाव तलाव येथे क्रॉस सिग्नल बसणार असे समजते. जर ओसरगाव तलावावर क्रॉस सिग्नल बसत असेल तर दोन्ही बाजूनी ओसरगाव -बोर्डवे - आंब्रड - कळसुली व इतर लगतच्या गावांकडे जाण्या- येण्यासाठी दोन्ही बाजूने बायपास रस्त्याची आवश्यकता आहे.
आपल्या स्तरावरून विचार विनिमय करून कळसुली फाट्यावर क्रॉस सिग्नल , गतिरोधक किंवा ओसरगाव तलावावरून बायपास रस्ता मंजूर करून मिळावा,अशी मागणीही करण्यात आली आहे.