सिंधुदुर्ग : कणकवली विधानसभेचे आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून पोदार एज्युकेशन ट्रस्टचे इंटरनॅशनल स्कूल कणकवलीत येत आहे. त्यासाठी कणकवली नगरपंचायतचा ६० गुठ्यांचा भुखंड जमिन मालकांच्या समंतीने प्रदान करण्यात आला.जून २०१९ मध्ये या स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया होणार असल्याने इमारत कामाचा शुभारंभ दसऱ्यांच्या मुहुर्तावर करण्यात येणार आहे़. पोदार एज्युकेशन ट्रस्टचे पोदार इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) पॅटर्नचे प्रायमरी आणि सेकेंडरी स्कूल कणकवलीत सुरू होणार आहे़त्या पार्श्वभूमिवर जमिन हस्तांतर कार्यक्रम कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामतेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी स्कूलचे जनरल मॅनेजर कर्नल शिरीष कुलकर्णी, वास्तू रचनाकार देवेंद्र ढेरे (पुणे), जमिन मालक प्रशांत सावंत, नाना कलिंगन, श्यामसुंदर पेडणेकर, गणपत म्हापसेकर, विठ्ठल म्हापसेकर, उत्तम म्हसकर आदी जमिनी मालक उपस्थित होते़.
पोदार इंटरनॅशनल स्कूल हे राष्ट्रीय स्तरावर काम करणारे आधुनिक शैक्षणिक संस्था आहे़.या संस्थेच्या माध्यमातून कणकवलीतील भावी पिढी घडविण्याच्या दृष्टिने आमदार राणे यांच्या संकल्पनेतून पोदार स्कूल साकार होत आहे़.त्याचा शुभारंभ दसऱ्याच्या मुहुर्तावर होईल, असा विश्वास जनरल मॅनेजर शिरीष कुलकर्णी यांनी व्यक्त केला. तसेच नगराध्यक्ष दालनात जमीन मालकांना धनादेशाचे वाटप यावेळी करण्यात आले.