सावंतवाडी : मुबलक पाणीसाठा असतानाही शहरात अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. सद्यस्थितीत पालिकेकडून एकवेळ पाणी सोडले जात असून, पाण्याच्या प्रवाहाचा वेगसुद्धा अतिशय कमी आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यावाचून गैरसोय होत आहे. याबाबत गुरुवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली.दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे ही समस्या उद्भवत आहे. मात्र, तरीही ज्याठिकाणी योग्य पाणीपुरवठा होत नाही, त्याठिकाणी उपाययोजना करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळू, असा शब्द जावडेकर यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिला.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, युवक तालुकाध्यक्ष राजू धारपवार, हिदायतुल्ला खान, संतोष जोईल, बावतीस फर्नांडिस, इफ्तिकार राजगुरू, नवल साटेलकर, देवा टेमकर, हर्षद बेग, अगस्ती फर्नांडिस आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी तालुकाध्यक्ष दळवी म्हणाले, शहरातील सर्वोदयनगर, सालईवाडा, होळीचा खुंट आदींसह अनेक ठिकाणी अतिशय तुरळक प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. सद्यस्थितीत एकवेळच पाणीपुरवठा सुरू असताना पाण्याचा प्रवाहही अतिशय कमी असल्यामुळे हे पाणी दैनंदिन वापराला पुरत नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यावाचून मोठी गैरसोय होत आहे. ही होणारी गैरसोय टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना राबविल्या जाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सावंतवाडीत अनियमित पाणीपुरवठा, राष्ट्रवादी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:59 PM
Sawantwadi Water Shortege ncp sindhudurg- मुबलक पाणीसाठा असतानाही शहरात अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. सद्यस्थितीत पालिकेकडून एकवेळ पाणी सोडले जात असून, पाण्याच्या प्रवाहाचा वेगसुद्धा अतिशय कमी आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यावाचून गैरसोय होत आहे. याबाबत गुरुवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली.
ठळक मुद्देसावंतवाडीत अनियमित पाणीपुरवठा, राष्ट्रवादी आक्रमक मुख्याधिकाऱ्यांची घेतली भेट