लांजा : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, व्हेळ नं. १ला आदर्श शाळा, स्वच्छ सुंदर शाळा म्हणून जिल्ह्यात गौरवण्यात आले. शैक्षणिक गुणवत्तेसह शाळांतर्गत कामगिरीची दखल घेत सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून, लांजा तालुक्यात मानांकन मिळवणारी पहिली शाळा ठरली आहे.व्हेळ शाळा नं. १ने ग्रामस्थांच्या उत्कृष्ट सहकार्याने यापूर्वी शालेय परिसर विकास प्रकल्प सन २००३ ते २००६मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्यात यश मिळवले होते. यासाठी अस्मिता लाड, मंदार खामकर यांचे योगदान लाभले. सन २०११मध्ये स्वच्छ सुंदर शाळा जिल्ह्यात पहिली आली. त्यावेळी उच्चश्रेणी मुख्याध्यापक भास्कर गुरसाळे, सहकारी शिक्षक उदय पाटील, पुष्पलता कांबळी, प्रतिभा निंबाळकर, दीपाली हातणकर, लाड यांचे योगदान लाभले होते.शाळेचे हे वैभव कायम ठेवून शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका राखी देसाई यांनी आयएसओसारखे मानांकन मिळवून शाळेचे नाव प्रगतीच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. या गौरवशाली मानांकनाच्या यशासाठी गावातील दिलीप पळसुलेदेसाई, व्हेळ सरपंच सुरेश शिगम, माजी सरपंच प्रकाश रामाणे, वासुदेव गाडे, काशिराम गावकार, वसंत धावडे, उमेश पडीलकर, आनंदी शिगम, ऋतुजा कदम, प्रियंका रामाणे यांचे सहकार्य लाभले.शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे, १०० टक्के पटनोंदणी व उपस्थिती आदर्श शाळा व्यवस्थापन समिती, उल्लेखनीय परिपाठ, उत्कृष्ट लोकसहभाग, पाणी व्यवस्था, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, शालेय कवायत, शिष्यवृत्ती निकाल, स्पर्धा परीक्षा, शालेय मंत्रिमंडळ, वाचनकट्टा, स्वयंअध्ययन कक्ष, कार्यानुभव मीना राजू मंच, कमळ टँक, वृक्षारोपण शालेय (बाजार), दहीहंडी, भाजीपाला उत्पादन, केळीची बाग, विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी, प्रतीक्षा कार्यशाळा (मतिमंद मुले), खाऊवाटप, उत्कृष्ट पोषण आहार वाटप, क्रीडा स्पर्धा, रक्षाबंधन, वाढदिवस आदी अनोखे कार्यक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.याशिवाय सन २०१५-१६ या शैक्षणिक उठावांतर्गत ३ लाख ५० हजार रुपये निधी जमवण्यात शाळेला यश आले आहे. या मानांकनासाठी पदवीधर शिक्षक मंगेश जाधव, उमेश केसरकर, उपशिक्षक स्नेहल राजाध्यक्ष, सुवर्णा लोहार, अनंत कदम, मच्छिंद्र मोहिते, केंद्रप्रमुख दिनेश पांचाळ यांनी मेहनत घेतली.शालेय परिसर व भौतिक सुविधा यांनी मोहीत झालेल्या अधिकाऱ्यांनी शाळेची आयएसओ मानांकनासाठी निवड केली आहे. लांजा तालुक्यात आयएसओ मानांकन मिळणारी ही पहिलीच शाळा आहे. (प्रतिनिधी)
‘आदर्श शाळा व्हेळ’ला आयएसओ मानांकन
By admin | Published: March 04, 2016 10:27 PM