शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

सावंतवाडी ‘चर्च’चा वाद संपुष्टात

By admin | Published: April 10, 2016 9:51 PM

राष्ट्रीय लोकअदालतीचे यश : ४० वर्षांनंतर नूतनीकरणाला परवानगी

सावंतवाडी : सावंतवाडी-सालईवाडा येथील जुन्या चर्चच्या नूतनीकरणासंदर्भात गेली ४० वर्षे सुरू असलेला वाद शनिवारी येथे झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत मिटविण्यात आला. ज्या लोकांचा नूतनीकरणासाठी विरोध होता, त्यांची समजूत घालून चर्चच्या नूतनीकरणासाठी परवानगी मिळाल्याने वादपूर्व प्रकरण हाताळण्यास लोकअदालतीला यश मिळाले आहे.तालुका विधी सेवा समिती सावंतवाडी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी येथील न्यायालयात आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन न्यायाधीश खालिद भेंडवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश दस्तगीर पठाण, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, नगरपरिषद मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, तहसीलदार सतीश कदम, सहायक गटविकास अधिकारी मोहन भोई, अ‍ॅड. शामराव सावंत, आदी उपस्थित होते.सावंतवाडी न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत ३६२ खटले ठेवण्यात आले होते. यातील १५९ खटले निकाली काढण्यात आले व ८ लाख ९ हजार ४६० एवढा दंड न्यायालयाने वसूल केला आहे. यामध्ये राष्ट्रीय बँका, नगर परिषद सावंतवाडी, तहसीलदार, प्रांत कार्यालय अदखलपात्र गुन्हे यांचा समावेश होता. या लोकअदालतीत सालईवाडा येथील ३६० वर्षे झालेल्या जुन्या चर्चच्या नूतनीकरणावरून गेली ४० वर्षे वाद सुरू होता. हे प्रकरण तडजोडीने मिटविण्यात यावे, यासाठी फादर इलियास रॉड्रिग्स व नूतनीकरणाला विरोध असणारे सर्वजण लोकअदालतीस उपस्थित होते. यावेळी चर्चच्या नूतनीकरणाला संमती देऊन हा वाद संपुष्टात आणण्यात आला. (वार्ताहर)