शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

रक्तदानातून समाजकार्याचा वसा जपत आहात हे कौतुकास्पद : अमित सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 7:19 PM

Blood Bank, Kankavli, Sindhudurngnews समाजकार्याचा वसा आपण सर्वजण या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जपत आहात, हे कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले.

ठळक मुद्देरक्तदानातून समाजकार्याचा वसा जपत आहात हे कौतुकास्पद : अमित सामंत नविनकुर्ली वसाहत येथे रक्तदान शिबिर

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याने आज नंदुरबार जिल्ह्याशी रक्ताचे नाते जोडले आहे. आमच्या जिल्ह्यातील रक्त आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील रोग्याचे प्राण वाचविण्यासाठी चालले आहे. याचा मला अभिमान वाटत आहे. आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला समाजकार्याचा वसा आपण सर्वजण या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जपत आहात, हे कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या पुढाकारातून कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मारुती निवास, नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट या ठिकाणी मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, पदवीधर सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मेस्त्री, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष नजीरभाई शेख, प्रांतिक सदस्य विनोद मर्गज, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राधानगरी तालुकाध्यक्ष किसन चौगुले, कणकवलीचे पक्ष निरीक्षक सावळाराम अणावकर, सुंदर पारकर, डॉ .अभिनंदन मालंडकर, मंगेश दळवी, सागर वारंग, निसार शेख, संदेश मयेकर, विष्णु पिळणकर आदी उपस्थित होते.सतीश सावंत म्हणाले , शरद पवार यांनी कृषी क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या योगदानातून कोकणातही कृषी क्रांती घडली आहे. आज त्यांच्या प्रेरणेतून याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेले रक्तदान शिबीर निश्चितच राज्यातील गरजू लोकांना अत्यंत उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले.डॉ. श्रीमंत चव्हाण म्हणाले, कोरोना आणि रक्त माणसाला माणुसकी शिकवतात, ते भेदभाव करत नाहीत. जातीयता ही अलीकडच्या काळातली गोष्ट आहे. रक्त हे माणसाला जीवन देते. त्याचे कारखाने कुठेच नाहीत. त्यामुळे रक्तदान करणे अत्यंत गरजेचे आहे.अनंत पिळणकर म्हणाले, या पुढच्या काळात जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांच्या मार्गदर्शनानुसार राजकारणाबरोबरच समाजकारण करत राहणार आहे. कार्यकर्त्यांनी अशीच साथ कायम द्यावी. यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग