शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

जन्मोजन्मी हिच पत्नी लाभू दे, पुरूषांकडून वटपौर्णिमा साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 3:51 PM

कुडाळ येथील विविध क्षेत्रातील पुरूषांनी सतत नवव्या वर्षी ही आगळीवेगळी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील गवळदेव येथे पुरुषवर्गाने मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली.

ठळक मुद्देजन्मोजन्मी हिच पत्नी लाभू दे, पुरूषांकडून वटपौर्णिमा साजरीकुडाळवासीयांचा सलग नवव्या वर्षी अनोखा उपक्रम

कुडाळ : कुडाळ येथील विविध क्षेत्रातील पुरूषांनी सतत नवव्या वर्षी ही आगळीवेगळी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील गवळदेव येथे पुरुषवर्गाने मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे गेली नऊ वर्षे पुरुष मंडळी एकत्र येत आगळ्यावेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करीत अनोखी प्रथा जोपासत आहेत. महिला जशी जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात तशीच प्रार्थना पुरुषांनी हीच पत्नी मिळावी यासाठी केली.

पत्नीला निरोगी आयुष्य लाभावे अशी प्रार्थनाही पुरुषांनी केली. कुडाळ येथे बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर व प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय निगुडकर यांच्या संकल्पनेतून आलेली पुरुषांची वटपौर्णिमा नऊ वर्षे पुरुष मंडळी वडाला फेऱ्या घालून साजरी करीत आहेत.यंदाही कोरोना या आजाराचे संकट घोंगावत असताना सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळून उत्साहात महिलांप्रमाणेच पुरुषवर्गाने वटपौर्णिमा साजरी केली.उमेश गाळवणकर म्हणाले, स्त्रीच्या साथीशिवाय, तिच्या त्यागाशिवाय पुरुष आपली प्रगतीची वाट चोखाळू शकत नाही. ती समर्थपणे संसार सांभाळते म्हणूनच पुरुष आपले कर्तृत्व सिद्ध करु शकला आहे. तिच्या या योगदानाचा गौरव म्हणजेच हे पुरुषांच्या वटपौणिमेच्या सणाचे आयोजन होय. अशा सणांना सर्व समाजाची साथ असणे महत्त्वाचे आहे.याप्रसंगी बॅ. नाथ पै महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य अरुण मर्गज म्हणाले, ह्यस्वामी गौरवार्थ अमृतह्ण असं म्हणत संसार करणारी स्त्री पुरुषाच्या प्रति किती निष्ठावान असते. हे लक्षात घेऊन ती निष्ठा आणि तिच्याबद्दलचा श्रद्धाभाव अशा उपक्रमातून आपण हाती घेऊन तो वाढीस लावला पाहिजे. पुरुषांच्या बरोबरीने समाजात असणारे स्त्री चे महत्त्व प्रतिपादन केले.यावेळी डॉ. व्यंकटेश भंडारी, परेश धावडे, प्रा. नितीन बांबर्डेकर, किरण करंदीकर, पांडुरंग पाटकर, प्रसाद परब, रोशन राऊळ, प्रसाद कानडे, प्रितम वालावलकर, किरण सावंत, संतोष पडते, सुरेश वरक, बळीराम जांभळे. प्रसाद राणे आदींसह अनेक पुरुष मंडळी उपस्थित होती. गेली ९ वर्षे उमेश गाळवणकर यांच्या संकल्पनेतून कुडाळमध्ये हा उपक्रम वटपौर्णिमेच्या दिवशी सातत्याने राबविण्यात येत आहे. त्यामुळे त्याचे कौतुकही होत आहे.उमेश गाळवणकर यांच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर : निगुडकरडॉ. संजय निगुडकर म्हणाले, पुरुष आपली विविध क्षेत्रे स्वयंसिद्ध करत असताना स्त्रीची साथ महत्त्वाची असते. स्त्री जर जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करून वडाला फेऱ्या मारत असेल तर पुरुषांनी सुद्धा घरची जबाबदारी सांभाळून स्त्री समर्थपणे साथ देते म्हणून आपल्याला कार्य करायला मोकळीक मिळते हे लक्षात घेतले पाहिजे. अशी पत्नी जन्मोजन्मी आपल्याला सहचारिणी मिळावी यासाठी हे व्रत करणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी नऊ वर्षांपूर्वी पुरुषांच्या वटपौर्णिमेचे लावलेले रोपटे आता दिवसेंदिवस भव्य रूप धारण करत आहे, हे आजच्या संसारामध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीचे महत्त्व वाढत असल्याचे द्योतक आहे. समाजाने अशा उपक्रमाच्या पाठीशी राहून हे उपक्रम जास्तीत जास्त दूर देशी पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सांगत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या व कौतुकही केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग