शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
2
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
3
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
4
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
5
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
6
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
7
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण
8
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
9
"जिवंत राहिले तर...!"; सुजलेल्या चेहऱ्यासह फोटो शेअर करत साध्वी प्रज्ञा सिंह यांचा काँग्रेसवर आरोप
10
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
11
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
12
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
13
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
14
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
15
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
16
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
17
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
18
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
19
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
20
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती

पर्यटनातून जैतापूर गावचा विकास

By admin | Published: November 19, 2015 9:15 PM

संजय यादवराव : खाडीमध्ये बॅक वॉटर टुरिझम व्यवसाय राबविण्याची योजना

जैतापूर : पर्यटनाच्या माध्यमातून जैतापूरचा विकास चांगल्या प्रकारे करता येण्यासारखा आहे. त्यातूनच येथील युवा पिढीला रोजगार मिळवून देता येईल, असे प्रतिपादन कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी जैतापूर येथील विलास मांजरेकर यांच्या घरी चर्चासत्राच्या वेळी केले. जैतापूरच्या खाडीमध्ये बॅक वॉटर टुरिझम व्यवसाय चांगल्या प्रकारे राबवता येण्यासारखा आहे. त्या माध्यमातून जैतापूर बाजारपेठेला उर्जितावस्था आणता येईल. यावेळी त्यांनी होळी गावाची पाहणी करून त्या ठिकाणी असलेल्या बीचला भेट दिली. होळी गावातील बीच विकसित करता येईल. तेथे रस्ते होणे प्रथम गरजेचे आहे. आंबोळगडपासून तिवरेपर्यंतचे समुद्रकिनारे कोकणातल्या पहिल्या पाच मधले आहेत. ते विकसित कसे करता येतील, याबाबत आराखडा तयार करून शासनाला पाठवण्यात येईल. वाडातिवरे हा भाग मागास असून, पर्यटकांना माहित नसलेला हा भाग आहे. त्यामुळे येथे पर्यटनाचा विकास झालेला नाही. मात्र, हा भाग आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जाऊ शकतो. याबाबत तपशीलवार योजना कशी आखता येईल, त्यासंदर्भात आपल्या हालचाली सुरु झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, केरळची पर्यटन आर्थिक व्यवस्था गेल्यावर्षी २८ हजार कोटी रुपये इतकी होती. कोकणाचा पायाभूत विकास केल्यास कोकणची पर्यटन आर्थिक व्यवस्था त्याहीपेक्षा अधिक वाढेल. येत्या मे महिन्यामध्ये जैतापूर खाडीमध्ये बॅकवॉटर फेस्टिव्हल आयोजित करणार असून, चित्रपट निर्माते महेश मांजरेकर, निर्माण बोल्डर्सचे अध्यक्ष राजेंद्र सावंत, सत्यसाई एक्सपोर्टचे अध्यक्ष विलास मांजरेकर, समर्थ लँड डेव्हलपर्सचे अध्यक्ष प्रदीप डोंगरे हे या फेस्टिव्हलकरिता पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चासत्रामध्ये जैतापूरचे पद्मनाभ मांजरेकर, गिरीष करगुटकर, सचिन नारकर, राकेश दांडेकर, सुनील करगुटकर, मनोहर कांबळी, पर्शुराम डोर्लेकर, जैतापूरचे अन्य ग्रामस्थ तसेच तिवरे गावचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश गुरव, नवनाथ हळदणकर, अमोल सिनकर, संतोष दुधवडकर उपस्थित होते. (वार्ताहर)बॅक वॉटर फेस्टिव्हल: विविध कार्यक्रमांची रेलचेलजैतापूर येथे बॅक वॉटर फेस्टिव्हल आयोजित करण्यात येणार आहे. या फेस्टिव्हलचे नियोजन करण्यात येत असून, सिने अभिनेता महेश मांजरेकर, राजेंद्र सावंत, विलास मांजरेकर, प्रदीप डोंगरे यांच्या सहकार्याने जैतापूर बॅक वॉटर फेस्टिव्हल भव्यदिव्य करण्याचा मनोदय संजय यादवराव यांनी व्यक्त केला आहे. या फेस्टिव्हलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सर्वांना या फेस्टिव्हलचे वेध लागले आहेत.रोजगाराची संधीजैतापूर परिसराचा विकास झाल्यास येथील स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. पर्यटनाच्या दृष्टीने हा परिसर महत्त्वाचा असल्याने याठिकाणी पर्यटकांना आकर्षिक करणे गरजेचे आहे. पर्यटन विकासाला चालना दिल्यास रोजगाराची संधी मिळू शकते.जैतापूरमध्ये बॅक वॉटर टुरिझम कंपनी स्थापन करणार.जैतापूर बॅक वॉटर फेस्टिव्हल मे २०१६ मध्ये घेणार.चर्चासत्रावेळी संजय यादवराव यांनी दिली माहिती.