कुडाळ : लोकसभा निवडणुकीत महायुती असताना देखील धनशक्तीकरिता भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाबरोबर एका हॉटेलमध्ये तडजोड केली असून याचे सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध झाले आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य संजय पडते यांनी पत्रकार परिषदेत केला. खासदार विनायक राऊत यांचा राजीनामा मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार जठार यांना नसल्याचा टोलाही त्यांनी जठार यांना लगावला.
कुडाळ शिवसेना शाखा येथे संजय पडते यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते नागेंद्र परब, जिल्हा परिषद सदस्या वर्षा कुडाळकर, अनुप्रीती खोचरे, राजू गवंडे, सतीश कुडाळकर उपस्थित होते.
संजय पडते म्हणाले, खासदार राऊत यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे सांगण्याचा व राजीनामा मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार प्रमोद जठार यांना नाही. कारण लोकसभा निवडणुकीत खासदार राऊत यांना कणकवली मतदारसंघातून ५४ हजार मते मिळाली होती तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ५६ हजार मते मिळाली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून खासदार राऊत यांना १ लाख ७८ हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. याचे चिंतन अगोदर करावे, असा सल्ला पडते यांनी जठार यांना दिला.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात धनशक्तीकरिता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाबरोबर जठार यांनी तडजोड केली होती. त्याचे पुरावे आता आमच्याकडे आले आहेत. त्यामुळे शिवसेना व खासदार राऊत यांच्या विरोधात जठार यांनी बोलू नये व त्यांना बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे भविष्यात शिवसेना व राऊत यांच्या विरोधात जठार यांच्याकडून टीका अपेक्षित नाही, असा सल्लाही जठार यांना त्यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघात शिवसेना व भाजप ही सरळ लढत जाहीर होती. असे असतानाही महायुतीत आहोत असे सांगणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मदत न करता कोणाला मदत केली हे सर्वांना माहीत आहे.
दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांविरोधात टीका करीत आहेत. मात्र, शिवसेनेने कधी पातळी सोडली नाही. युती करण्यासाठी कोण मातोश्रीवर गेले होते? मंत्रीपदांमध्ये सेनेला कोणी फसवले? मुख्यमंत्री अडीच वर्षाचा देण्याचे मान्य करून आता कोण नकार देत आहे? हे सर्व जगजाहीर आहे. त्यामुळे ह्यखोटे बोलावे पण रेटून बोलावेह्ण अशी स्थिती भाजपची असल्याचा टोला पडते यांनी लगावला.रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे शिवसेनेचे बालेकिल्ले असून येणाºया सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर विजयी होईल, असा विश्वास पडते यांनी व्यक्त केला.जठारांनी महाविकास आघाडीची चिंता सोडावीशिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार हे तीन पैशाचे सरकार असून तीन वर्षे टिकू शकत नाही, असे बोलणाºया जठारांनी आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारबाबत काळजी करू नये. आमचे सरकार नक्कीच पाच वर्षे व्यवस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जठार राणेंची तळी उचलतातआमदार नीतेश राणे यांनी जठारांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता. त्याच राणेंची तळी उचलण्याचे काम जठार करीत असल्याचा टोला पडते यांनी जठार यांना लगावला.