शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

झुणका भाकर केंद्राच्या इमारती धूळ खात

By admin | Published: May 12, 2016 11:34 PM

‘युती’च्या उपक्रमाची केवळ आठवणच : बचतगटांसाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता, इमारती वापरात आणण्याची गरज

वैभव साळकर-- दोडामार्ग  -महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या तत्कालीन युती शासनाच्या कार्यकाळात सुरू झालेली झुणकाभाकर योजना आता बंद आहे. मात्र, या योजनेच्या अनुषंगाने राज्यात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या झुणका भाकर केंद्राच्या इमारती मात्र विनावापर धूळ खात बंद असून, मोडकळीस आल्या आहेत. या इमारतींची दुरूस्ती करून त्या बचतगटांसाठी उत्पादित केलेल्या मालासाठी विक्री केंद्र म्हणून उपलब्ध करून दिल्यास राज्यातील लाखो बचत गटांसाठी त्याचा फायदा होईल.१९९५ साली महाराष्ट्रात सेना-भाजपा युतीचे सरकार आले आणि त्यावेळी मुख्यमंत्रीपदाचा मान मनोहर जोशी यांना मिळाला. १९ मार्च १९९५ ला मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांनी एका महिन्यामध्ये २७ एप्रिल १९९५ ला राज्यात झुणका भाकर केंद्र चालविण्याबाबतची योजनेची घोषणा केली. १ मे १९९५ ला ही योजना अंमलात आली. गोरगरीब लोकांना १ रूपयात झुणका भाकर देण्याची ही योजना होती. या योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यात हजारो झुणका भाकर केंद्रे अस्तित्वात आली. पण सन २००० साली राज्यात युतीची सत्ता जाऊन काँग्रेस- राष्ट्रवादीचे आघाडी सरकार अस्तित्वात आले. या सरकारने युती शासनाच्या काळात सुरू झालेली झुणका भाकर योजना बंद केली. ही योजना बंद होऊन आता १६ वर्षे पूर्ण झाली. पण आजही झुणका भाकर केंद्राच्या इमारती मात्र राज्यात अनेक ठिकाणी धूळ खात विनावापर पडून आहेत. देखभाल दुरूस्ती अभावी ही झुणका भाकर केंद्रे मोडकळीस आली असून, जागेचा अपव्ययदेखील त्यामुळे होत आहे. ही योजना राबविण्यामागे त्यावेळी युती शासनाचा उद्देश समाजातील दुर्बल असहाय्य घटकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना सक्षम बनविण्याचा होता. पुढे ही योजना जरी बंद झाली, तरी बचत गट सक्षमीकरणासाठी चळवळ मात्र आघाडी शासनाच्या काळात सुरू झाली. बचत गट सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविल्या गेल्या आणि आजही त्या प्रभावीपणे रााबविल्या जात आहेत.तेव्हा, आताही युतीचीच सत्तासन १९९५ रोजी राज्यात युतीची सत्ता होती. त्यावेळी झुणका भाकर योजना सुरू झाली. कालांतराने आघाडी शासनाच्या काळात ती बंद झाली. त्यानंतर पुन्हा १६ वर्षांनी राज्यात युतीची सत्ता आहे.